"आपणा सारखे करीती इतरे जना"


 "आपणा सारखे करीती इतरे जना"

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28/03/2025 : प्रत्यके मनुष्य, प्रत्येक व्यक्ती ही आपल्या सहवासात येणाऱ्या अन्य व्यक्तीला आपल्यासारखे करण्याचा प्रयत्न करीत असते. तो जर शाकाहारी असेल तर तो पुढील माणसाला शाकाहारी करायचा प्रयत्न करतो. व्यसनी असेल तर व्यसनी करण्याचा प्रयत्न करतो.  धाडसी असेल तर धाडसी करण्याचा प्रयत्न करतो. भेकड असेल तर भेकड करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय प्रत्येक जण आपल्यात असणारे गुण अवगुण पुढील व्यक्तीत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपला समाज हा अंधानुकरण करणे यावर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे बहुतेक समर्थ रामदासांनी "आपणासारखे करीती इतरे जना" असा श्लोक लिहिला आहे.

 आज हे लिहायचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जे शिवराळपणा जो  गल्लीच्छपणा हा चरम सीमेवर पोचलेला आहे तो पाहिला असता हे राजकारणी लोक स्वतः तर घाणीत लोळतातच पण त्या घाणीत इतर लोकांना सुद्धा लोळणे भाग पाडतात.

 फुकटेगिरीचा महामेरू

आपल्या देशात एक नेत्यांनी अण्णा हजारेंच्या बरोबर उपोषण करून स्वतःची प्रतिमा निर्माण केली. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे म्हणून जनतेने पण त्यांना साथ दिली. केजरी वाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यांना सत्तेची हाव सुटली व त्यांनी रेवडी वाटायचा एक नवीन प्रधात या देशात पाडला. बसचे तिकीट फुकट, धान्य फुकट, पाणी फुकट, वीज फुकट,फक्त फुकटेगिरी ची चरम सीमा केवळ मते मिळण्यासाठी केजरीवाल यांनी सुरू केली. 

मग निर्वाह निधी असू दे सन्माननिधी असू दे  अशी गोंडस नावे या  फुकटे गिरीला देण्यात आली आणि दहा वर्षातच केजरीवाल्यांच्या या एका भंपकृत्यामुळे काँग्रेस भाजप व सर्व पक्ष घसरतीला लागले. त्यांनी ओळखले आपण जर फुकटेगिरी जाहीर केली नाही तर आपल्याला मते मिळणार नाहीत व आपली सत्ता राहणार नाही किंवा सत्ता येणार नाही. त्यामुळे घोषणांचा पाऊस पडू लागला व सरकारी खजिना रिकामा होऊ लागला. आता ही घसरण फक्त क्रांती झाली तरच थांबू शकेल.

 तोपर्यंत ह्या जीव घेण्या फुकटेगीरी मध्ये सर्व राजकीय पक्ष चालत राहणार आहेत व आळशी गिरी करणारी काम न करणारी व केवळ सवलतीवर जगणारी नवीन पिढी तयार होईल. कोणीही कष्ट करून घाम गाळून आपला संसार चालवण्यापेक्षा सरकारी मदतीकडे लक्ष देऊन राहतील. 

जे फुकट रेशन वाटले जाते ते पुन्हा उपहारगृहाचे चालक विकत घेतात कारण कुटुंबाच्या गरजेपेक्षा अधिक रेशन अधिक निर्वाह निधी फुकटचे पाणी असे सर्व सुरू झाल्याने प्राथमिक गरजा भागल्यानंतर आता कशाला राबायचे असा प्रश्न सर्वसामान्य माणसापुढे उभा राहिला आहे. हे सर्व केजरीवाल यांनी आपल्या विलक्षण मेंदूतून युक्ती काढून सर्व राजकीय पक्षांना आपल्या मागे फरफरडत नेले आहे.

 विषवल्ली 

 आज केजरीवाल्यांची सत्ता कमी झाली असेल पण त्यांनी पेरलेले हे विष बीज  येती अनेक शतके आपल्या देशाला भोगावे लागणार आहे आणि "आपणा सारखे करती इतरे जना" हे सिद्ध करून दिले आहे.

 शिवराळपणाचा कळस 

 2014 पासून भाजप शिवसेनेत मध्ये वाद सुरू झाल्यावर एक नवा तारा उगवला आहे त्याचे नाव आहे संजय राऊत. या संजय राऊतनी सगळ्या चहा बिस्कीट  पत्रकारांना आपल्या अंकित करून घेतले आहे व रोज सकाळी आवश्यक व अनावश्यक कॉमेंट करणे, थुकून दाखवणे, तिरस्काराने  बोलणे, घाणेरड्या कॉमेंट करणे असे सुरू केले. प्रथम प्रथम सर्व राजकीय पक्षातील प्रमुख व विचारी लोकांनी याकडे दुर्लक्ष केले. संजय राऊत यांची ही आयडिया चांगली आहे असे वाटून त्यांच्याच पक्षाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे हे लोक व राष्ट्रवादी पक्षाचे रोहित पवार व सुप्रिया सुळे यांनी पण जमेल तसे खऱ्या खोट्या गोष्टी समाजापुढे मांडून आपले राजकारण दाखवून देणे सुरुवात केली.

ह्या एका संजय राऊत मुळे त्यांच्या पक्षांमध्ये त्याच्यासारखे अनेक जण तयार झाले. पण यांना विरोध करता करता इतर पक्षातील चांगले विचारी आमदार, महिला आमदार ह्या पण आता संजय राऊतला शिवराळ पणात, गलिच्छ बोलण्यात व अनावश्यक बोलण्यात मागे टाकत आहेत. त्यामुळे संजय राऊतनी पण सिद्ध करून दिले आहे की "आपणासारखे करती इतरे जना". 

अनिल रुईकर वकील 

98 232 550 49

 इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या