सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना विविध प्रलंबित विकासाकामाबाबत निवेदन

 

सामाजिक न्यायमंत्री  संजय शिरसाट यांना विविध प्रलंबित विकासाकामाबाबत निवेदन 

वृत्त एकसत्ता न्यूज

पेठ वडगाव दिनांक 24/03/2025 : वाठार तर्फे वडगांव येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्युशन येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनाच्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट हे आले असता भाजपाचे संतोष माळी यांनी ना.शिरसाट यांची भेट घेऊन वडगाव शहरातील विविध प्रलंबित विकासाकामाबाबत निवेदन देण्यात आले.              

निवेदनात म्हटले आहे की पेठ वडगाव शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा पूर्णाकृती व्हावा तसेच चौकाचे सुशोभिकरण व्हावे, रमाई घरकुल योजने अंतर्गत म्हाडाच्या धर्तीवर घरकुल विकास व्हावा व पेठ वडगाव शहरात भव्य असे सर्वसोयीनुक्त वसतिगृह व्हावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन पत्र दिले.

यावेळी नामदार शिरसाट यांनी पेठ वडगाव शहराच्या विविध विकासासाठी सामाजिक न्याय विभागा मार्फत महायुती सरकार कडून सर्व कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला व प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करावा लवकरच यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी हातकणंगले विधानसभेचे आमदार डॉ.अशोकराव माने , माजी आम.डॉ सुजित मिणचेकर,केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जि.प‌.सदस्या सौ.मनीषा माने, मा.जि.प.सदस्य प्रवीण यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाजपा तालुका प्रमुख अमरसिंह पाटील, सुहास राजमाने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने, अमर पाटील, तय्यब कुरेशी, आप्पा माने, तानाजी ढाले, नाथा पिसे, राजकुमार मिठारी, ऋषिकेश भंडारे, गौरव तोरसकर, सागर साखळकर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या