डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना अल्पोपहार व खाऊ वाटप

डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

मुलांना अल्पोपहार व खाऊ वाटप

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11/03/2025 :  जनसेवा संघटनेचे कुटुंबप्रमुख युवक हृदय सम्राट डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अकलूज या शाळेतील मुलांना अल्पोपहार व खाऊ वाटप करण्यात आले. 

शेखर भालचंद्र शेंडे, अरुण सुधीर शहाणे यांच्या तर्फे पाव भाजी आणि आईसक्रीम, देण्यात आले. तसेच दीपक सुत्रावे,संजय गाडे यांच्या तर्फे खाऊ वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अकलूज या स्कूलच्या अध्यक्षा, प्राचार्य,डॉ.सौ उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील आणि स्कूलचा सर्व शिक्षक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या