वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/03/2025 : २० मार्च हा 'जागतिक आनंद दिवस'. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबिइंग रिसर्च सेंटरने २० मार्च २०२५ रोजी ‘जागतिक आनंद अहवाल’ प्रसिद्ध केला. यात भारत ११८ व्या स्थानी आहे. तर पाकिस्तान १०९ व्या स्थानी आहे. फिनलँड यावर्षी सर्वाधिक आनंदी देश ठरला, तर डेन्मार्क, आईसलँड अनुक्रमे दुसर्या नि तिसर्या स्थानावर आहेत.
कोस्टा रिका आणि मेक्सिको प्रथमच १० मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. ६ व्या आणि १० व्या क्रमांकावर भारताची सर्वात नीचांकी रँकिंग २०१२ मध्ये १४४ होती; तर २०२२ मध्ये सर्वाधिक ९४ व्या स्थानावर होता. नेपाळ (९२) आणि चीन (६८) हे भारताच्या पुढे आहेत. शेजारचा पाकिस्तान १०९ व्या स्थानावर असून श्रीलंका (१३३) आणि बांगलादेश (१३४) भारताच्या मागे आहेत. या अहवालात ६ मुख्य घटक विचारात घेतले गेले.
*सामाजिक समर्थन : भारताला उच्च गुण मिळाले, कारण मोठे कुटुंब, सामुदायिक संस्कृती आणि लोकांमधील सहकार्य यामुळे सामाजिक आधार मजबूत आहे.
*स्वातंत्र्याचा अभाव : या घटकात भारताला सर्वात कमी गुण मिळाले. अहवालात असे नमूद केले आहे की, लोकांना त्यांच्या जीवनाविषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किती आहे आणि त्या निर्णयांमुळे समाधान मिळते का, यावर भारत कमी पडतो. अफगाणिस्तान यादीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे, जिथे अनेक महिलांनी आपल्या जीवनातील वाढत्या अडचणी बद्दल सांगितले आहे. सिएरा लिओन आणि लेबनॉन हेही सर्वात तळाच्या देशात आहेत. यादीत युरोपियन देशांनी आघाडी घेतली आहे, कारण तेथे सामाजिक सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि जीवनमान उंचावणारे घटक अधिक चांगले आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या