हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा - संजय वाघमोडे 💢यशवंत क्रांती संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

 

हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा - संजय वाघमोडे 

💢यशवंत क्रांती संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/03/2025 : आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी प्रसंगी संघर्ष करावा लागला तर संघर्ष करण्याची तयारी ठेवली तरच आपले  हक्क आपल्याला मिळू शकतील असे प्रतिपादन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक व राज्यपाल नियुक्त मेंढपाळ समिती सदस्य संजय वाघमोडे यांनी केले. ते सातबारा लोन बांबवडे येथे आयोजित  शाहुवाडी तालुक्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी शाहुवाडी तालुका युवक अध्यक्ष संजय डफडे ही उपस्थित होते. ते बोलताना पुढे म्हणाले की मेंढपाळ व धनगर वाड्यावरील लोकांच्यावर रोज कुठे ना कुठेतरी अन्याय होतो शासकीय अधिकारी कागदी घोडे नाचवत सर्वसामान्यांना वेठीस धरतात हे थांबवायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागेल. यावेळी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शाहूवाडी तालुका अध्यक्ष म्हणून सुभाष शिवाजी वग्रे, सोनवडे, यांची, आनंदा मारुती बंडगर तालुका उपाध्यक्ष सरुड, राजेंद्र मारुती सिसाळ चरन, तालुका सरचिटणिस , दत्तात्रय रंगराव मुडळे शिवारे तालुका संपर्क प्रमुख , भिमराव दादु जानकर, डोणोली यांची तालुका सदस्य  म्हणून निवड करण्यात आली.  निवडपत्र प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय रंगराव मुंडळे शिवारे शाखा संपर्क प्रमुख, संभाजी सदाशिव बंडगर सरुड, आनंदा मारुती बंडगर सरूड, रायसिंग सर्जेराव शिसाळ, चरण शाखा संपर्कप्रमुख, वसंत कोंडीबा वगरे, सोनवडे शाखाप्रमुख, संग्राम सर्जेराव बंडगर सदस्य सोनवडे, अवघडा शिंगू वगरे सोनवणे, भीमराव दादू जानकर शाखा संपर्कप्रमुख, नामदेव बाबासो वगरे सोनवणे उपप्रमुख, रावजी आकाराम वगरे सेक्रेटरी सोनवणे,  नागेश पांडुरंग वगरे सोनवणे शाखाध्यक्ष, आदिनाथ बाळू कारंडे पाटणे शाखाध्यक्ष, कृष्णात युवराज जानकर पाटणे शाखा उपाध्यक्ष, राजेंद्र मारुती शिसाळ शाखाध्यक्ष चरण, नथुराम शंकर बंडगर सरूड शाखा उपाध्यक्ष, सुरेश आनंदा मुंडळे शाखाध्यक्ष शिवारे, संदीप बापू मंडळे शाखा सदस्य शिवारे, महादेव युवराज जानकर सदस्य डोणोली, शुभम तानाजी कारंडे पाटील शाखा सदस्य डोणोली शाखा, बाळू गुंगा कारंडे पाटणे शाखाध्यक्ष,  विजय धोंडीराम मुंडळे शिवारे शाखा उपाध्यक्ष, विलास केशव गवरे मंडलाईवाडी शाखाप्रमुख, संजय श्रीपती मुडळे शिवारे शाखा सेक्रेटरी, अनिल भीमराव जानकर डोणोली शाखा सदस्य, पोपट बाळू बंडगर सरूड शाखा सदस्य, हैबती शामराव जानकर डोणोली शाखा खजिनदार, उत्तम जानकर, संदीप जानकर  इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या