प्रथम क्रमांकाच्या"बेस्ट टर्न अराउंड बँक" पुरस्काराने सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑप. बँक सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/03/2025 : मार्च 2024 अखेर आर्थिक स्थितीवर आधारित बँको ब्लू रिबन तर्फे प्रथम क्रमांकाच्या"बेस्ट टर्न अराउंड बँक" पुरस्काराने सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑप. बँकेस सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथे संपन्न झालेल्या समारंभामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया चे माजी जनरल मॅनेजर भरडेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन डॉक्टर अरविंद गांधी, बँकेचे संचालक डॉक्टर विठ्ठल कवितके, संचालक अजित गांधी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या निमित्ताने बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड. शिरीष फडे यांनी सांगितले की बँकेच्या उत्तम आर्थिक स्थितीमुळे व बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद व ग्राहक यांच्या सहकार्याने बँकेस पुरस्कार मिळाला आहे मार्च 2024 अखेर आर्थिक स्थितीवर आधारित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून मार्च 24 अखेर बँकेच्या 35 कोटी रुपयांच्या ठेवी असून 18.50 कोटी कर्ज वाटप झाली आहे बँकेचा नेट एनपीए 0% असून 38.17 लाख इतका नफा झालेला आहे.
0 टिप्पण्या