🔵 शेतकऱ्यांना प्रतीगुंठा ४०००/- रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी - संजय वाघमोडे 🟣 यशवंत क्रांती चे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन

 

🔵 शेतकऱ्यांना प्रतीगुंठा ४०००/- रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी - संजय वाघमोडे

🟣 यशवंत क्रांती चे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन        

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 29/03/2025 :

वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने ऊस, भुईमूग, मका, यासारख्या पिकाची गवारेडा, रानडुक्कर, माकड, यासारख्या पिकांची होणारी नासाडी बघत राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वनविभाग पंचनामे करुन अगदीच तुटपुंजी मिळत आहे. याबाबत शासनाने सरकट प्रतीगुंठा ४ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी शाहुवाडी यांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्यात यावे.पिक नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना व्याजासहित नुकसान भरपाई मिळावी. तसेच अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचा संबंधित काळातील नुकसान भरपाई चे सर्वेक्षण करण्यात यावे.  अन्याय झालेल्या शेतकरी व पशुपालकांना नुकसान भरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसुल करून देण्यात यावी.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व वन्यप्राण्यांच्या पासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीगुंटा ४०००/- रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.

वनवासी नागरिकांना अतिक्रमण धारक घोषित करणारे सर्व निर्णय रद्द करून त्यांना त्यांच्या घटनात्मक हक्कांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

धनगरवाड्यांना जोडणारे रस्ते वन कर्मचारी अडवतात व रस्ते मंजूर साठी देण्यात आलेले ठराव मंजूर करण्यासाठी अनेक महिने लागतात यातील दिरंगाई थांबवून तातडीने रस्ता मंजूर पत्र देण्यात यावीत. 

औषधी वनस्पती, जंगलात फिरणे रानमेवा गोळा करण्यासाठी मज्जाव करून पारंपरिक वननिवासी वनहक्क २००६ च्या कायद्याची राजरोस पायमल्ली करण्यात येत आहे. ते थांबवावे. 

सरसकट सर्व मेंढपाळांना  चराईपास देणेचे शासन निर्णय असताना सरसकट मेंढपाळांना चराईपास देणेत आले नाहीत. ते देण्यात यावे. 

धनगर वाड्यावरील विषेशतः 

जंगलात राहणाऱ्या वननिवासी यांना गंँस मिळत नाही, राकेल बंद आहे, वन कर्मचाऱ्यांच्या कडून  झाडाच्या वाळलेल्या फांद्या किंवा औषधी वनस्पती,गोळा करताना, किंवा पाळीव जनावरांना चारा गोळा करण्यासाठी अडवणूक केली जाते. ती करण्यात येऊ नये. 

मेंढपाळ हा भटकंती करत असतो. अनेक वेळा वन हद्दीत शेळ्या मेंढ्या सह असताना त्यांना अडवून ठेवले जाते.तसे न करण्यात येऊ नये.इत्यादी मागण्यांचा समावेश आहे

योग्य निर्णय घेण्यात यावा. अन्यथा  संघटनेच्या वतीने या विषयावर तीव्र आंदोलन उभारले जाणार आहे. तसेच, जनतेच्या न्यायासाठी आणि वनवासी, शेतकरी, पशुपालक यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कोणतीही तडजोड करणार नाही. निवेदनावर संजय वाघमोडे, दत्तात्रय रंगराव मुडळे शिवारे, तालुका संपर्क प्रमुख सुभाष वग्रे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष, आनंदा मारुती बंडगर सरुड तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मारुती सिसाळ तालुका सरचिटनिस भिमराव दादु जानकर डोणोली तालुका सदस्य वसंत कोंडीबा वग्रे सोनवडे  प्रमुख विलास केशव लवटे मंडलाईवाडी दगडु शंकर लवटे नथुराम शंकर बंडगर सरुड रायसिंग सर्जेराव सिसाळ सनिराज पंडीतलाड,  महेंद्र कृष्णा सिसाळ चरण , आदिनाथ बाळु कांरडे पाटणे, आयुष आनंदा कांरडे पाटणे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या