जलयुक्त शिवार अटल भूजल योजनेची माळशिरस तालुक्यातील कामे प्रगतीपथावर

 


जलयुक्त शिवार अटल भूजल योजनेची माळशिरस तालुक्यातील कामे प्रगतीपथावर

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 03/03/2025 : जलयुक्त शिवार अटल भूजल योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन पंचायत समिती सभापती शोभाताई साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर गटाचे सर्व पंचायत समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून 293 नवीन सिमेंट बंधारे बांधणेचा आराखडा तयार करण्यात आला होता. यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामांना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पंचायत समिती माळशिरस यांच्या माध्यमातून विजयगंगा प्रकल्प भांब ते येळीव असा दोन टप्प्यांमध्ये ओढा खोलीकरण, सरळीकरण, बंधारे दुरुस्ती व नवीन बंधारे असा आराखडा सादर केला होता.

भांब ते इस्लामपूर या प्रथम टप्प्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. कै. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त दुसरा टप्पा इस्लामपूर ते येळीव या टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ओढ्यावरती अटल भूजल योजनेअंतर्गत भांब येथे 4 बंधारे, कन्हेर येथे 3 बंधारे, इस्लामपूर येथे 2 नवीन सिमेंट बंधारे तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जाधववाडी 3 बंधारे, भांबूर्डी 1 बंधारा, येळीव 1 बंधारा, मेडद 2 बंधारे, तिरवंडी 3 बंधारे, प्रतापनगर चाकोरे 2 बंधारे, झिंजेवस्ती 1 बंधारा, फळवणी 1 बंधारा, विठ्ठलवाडी 1 बंधारा, मांडवे 7  बंधारे, कचरेवाडी 1 बंधारा, देशमुखवाडी 7 बंधारे, शिंदेवाडी 2 बंधारे, कळंबोली 1 बंधारा, एकशिव 1 बंधारा, मारकडवाडी 2 बंधारे, खुडूस 4 बंधारे,फोंडशिरस मोटेवाडी 2 असे सदरचे बंधारे मंजूर असून सदरची कामे प्रगतीपथावरती आहेत. हे सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे प्रशासनाने नियोजन केलेले आहे. हे कामे पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती मार्गी लागणार आहे. तसेच शासन स्तरावरती जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे आराखड्यातील उर्वरित नवीन बंधाऱ्याची कामे मंजूर होतील.स

जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे येळीव व पुरंदावडे येथे भूमिपूजन.

पुरंदावडे व येळीव  येथील  तीन नवीन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचे संयुक्त भूमिपूजन  माढा लोकसभा  खासदार  धैर्यशील मोहिते पाटील  व माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर व माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या तिनही कामांना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून कामे पूर्ण झाल्यावर भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या बांधाऱ्यांच्या कामामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. पुरंदावडे व येळीव येथील  कार्यक्रम प्रसंगी बाबासाहेब माने पाटील, खरेदी विक्री संघांचे अनिल पाटील, श्री शंकर सहकारीचे संचालक दादासो वाघामोडे, मा. सरपंच संतोष राऊत, सरपंच शिवाजी जाधव, मा. उपसरपंच उघडेवाडी मोहन कचरे, मच्छिन्द्र कर्णवर, विठ्ठल अर्जुन, सरपंच विरकुमार दोशी, उपसरपंच विष्णू भोंगळे, मा. उपसरपंच उदय धाईंजे, तानाजी ओवाळ, युवराज देशमुख तसेच पुरंदावडे, येळीव चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध  संस्थांनचे पदाधिकारी, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या