🟡 यशवंत क्रांती संघटनेचे मंत्री, शिरसाठ, व आ. पडळकरांना निवेदन
🟣 तानाजी बाजारी यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये अर्थिक मदत शासनाकडून मिळावी - संजय वाघमोडे,
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/03/2025 : गारगोटी येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी तानाजी बाजारी याचा विहीरीत ढकलून खुन करण्यात आला आहे. या खुनाचा तपास, वसतिगृहातील असुविधा याची चौकशी करावी व तानाजी बाजारीच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये अर्थिक मदत शासनाने करावी अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व आमदार गोपीचंद पडळकर यांना यशवंत क्रांती संघटनेच्यावतीने अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि दि. १९ मार्च २०२५ रोजी कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या गारगोटी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहातील तानाजी बाजारी याचा विहीरीत ढकलून दिल्याने मृत्यू झाला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह ही गोरगरीब विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सुरू केली आहेत .मात्र या वस्तीगृहातील धनगर समाजातील हुषार विद्यार्थी तानाजी बाजारी या विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला आहे. पण या वेळी याठिकाणी असणारे वस्तीगृह अधिक्षक हजर नव्हते. याबरोबरच या ठिकाणी शासकीय इमारतीचे बांधकाम ही सुस्थितीत नाही, तर सोयी सुविधाचा वाणवा आहे. विद्यार्थी अंघोळ व कपडे धुण्यासाठी विहिरीवर जात असतात. या वस्तीगृहात राहणारी मुलं ही बहुतांश जंगलात राहणाऱ्या धनगर समाजातील मुलं आहेत आजही या धनगर वाड्यावर रस्ते व साधी अंगणवाडी सुध्दा नाही. अशा मुलांना वस्तीगृहात यावे लागते. मुलांना रात्री अपरात्री भितीच्या छायेखाली रहावं लागतं वस्तीगृह परिसरात नशा करणाऱ्या तसेच मद्यपान करणाऱ्या तरुणांचा वावर नेहमीच असतो. अशाच नशा करणाऱ्या तरुणांने ढकलून दिल्यानेच हि घटना घडली आहे. येथे देण्यात येणारा पोषण आहार ही व्यवस्थीत दिला जात नाही, त्यामुळे हे शासकीय वसतीगृह असुन खोळंबा नसुन घोटाळा असंच म्हणावं लागेल. तरी येथील सर्व कामांची चौकशी करून कारवाई करावी. तसेच हे वस्तीगृह इमारतीसह सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्याची गैरसोय टाळावी. अशी मागणी करत आहोत, गारगोटी येथील वस्तीगृहात तानाजी बाजारी या विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला आहे तानाजी चे आई वडिलांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असुन त्यांचा धीर खचला आहे. कृपया त्याच्या कुटुंबीयांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणीही यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने करत आहोत.
शिष्टमंडळात संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना, आप्पाजी मेटकर जिल्हाध्यक्ष , अमोल मेटकर जिल्हा उपाध्यक्ष,अरुण फोंडे जिल्हा युवक अध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांची समावेश होता.

0 टिप्पण्या