जेथे जेथे धुर असतो तेथे तेथे आग असते
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/03/2025 : जेथे जेथे धुर असतो तिथे आग असते अशा अर्थाची एक हिंदी म्हण आहे आता ही म्हण बदलून जिथे जिथे आग असते तिथे तिथे नोटा असतात असे म्हणावे लागेल
आज देशामध्ये न्यायव्यवस्था व भ्रष्टाचार हा विषय कुठलीही न्यूज चॅनल,यूट्यूब चैनल, व्हाट्सअप पाहिले असता दिल्लीतील नोटा कांड यावर भाष्य खरी खोटी माहिती आपले विचार हे सर्वजण वाटत आहेत.
जुगाराचे अड्डे
सुमारे तीस वर्षांपूर्वी नानीपालखी वालाच्या सारख्या कायदेतज्ञ वकीलानीआमची न्यायालय म्हणजे जुगाराचे अड्डे आहेत असे विधान केलेले मला आठवते त्यांनी न्यायव्यवस्थेला "कॅसिनो" असे नाव दिले होते.
का बरं हा भ्रष्टाचार सुरू होतो
सुमारे 45 वर्षांपूर्वी इचलकरंजीला एस के राऊत नावाचे एक न्यायाधीश होते अतिशय दिलखुलास व कनवाळू व्यक्तिमत्व आमच्या त्या पिढीतील वकिलीमध्ये मार्गदर्शन करून गोड बोलून आमच्या चुका आम्हाला दाखवून आमच्याकडून चांगल्या प्रकारे कामे करून घेतली
ते वकिलांशी मनमोकळेपणाने बोलत असत एकदा न्यायालयातील भ्रष्टाचार या विषयावर सहज गप्पा मारताना ते म्हणाले की आमच्या न्यायाधीशांच्या मध्ये असणारे दोष हे आम्ही वकिलांना भ्रष्टाचार करायला शिकवतो हे म्हणाले समजा मी तुमच्यापैकी उद्या कुठल्याही वकिलाकडे मला पार्टी दे म्हणून सांगितले तर कोणत्या वकिलाची हिम्मत होणार आहे मागणी अमान्य करायची आणि ह्या ठिकाणहूनच भ्रष्टाचारास सुरुवात होते या ठिकाणाहूनच घसरणीला सुरुवात होते त्यामुळे जितका न्यायाधिश निस्वार्थी तितके ही व्यवस्था चांगली राहील.
एस के राऊत नंतर साताऱ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व त्यानंतर ते निवृत्त झाले माझ्या माहितीप्रमाणे त्यांची कन्या न्यायिक व्यवस्थेमध्ये कुठेतरी न्यायाधीश आहेत
बारीक बारीक गोष्टीतून सुरुवात होती मग यशवंत वर्मांच्या सारखे नोटांची पोती घरात सापडतात काही चांगल्या व काही जळलेल्या मग सर्वजण भ्रष्टाचारावर चर्चा करून लागतो
भ्रष्टाचाराची मा बाबाराव भिडे कृत व्याख्या
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सांगली न्यायालयात एक लाचलुचपत विषयक कामकाज सुरू होते माननीय बाबाराव भिडे हे एक कसलेले फौजदारी वकील होते ते या कामी आरोपीची बाजू मांडावयास सांगलीला आले होते त्यांनी सरकारी अधिकाऱ्याला प्रश्न विचारताना तुम्ही प्रामाणिक आहात काय असा प्रश्न विचारला त्यांनी होय म्हणून सांगितल्यावर एकही सरकारी अधिकारी प्रामाणिक नसतो असे विधान केले अर्थात ही विधान डायस वरील ज्यांच्या पुढे काम सुरू होते ज् त्या न्यायाधीशांना जरा खटकणारे होते मधल्या सुट्टीत त्यांनी भिडेच्या ज्युनिअरला बोलावून घेतली व भिडे साहेब सिनियर आहेत त्यांनी असे म्हणू नये असे सुचवले की जूनियर सुद्धा चलाख होते ते म्हणाले ते असे का म्हणाले की मी त्यांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो बाबारांना त्या ज्युनियरनी तुम्ही असे का म्हणालात असे जज्ज मला विचारत होते म्हणून सांगितले त्यावर बाबाराव म्हणाले मुलाची शाळेचा प्रवेश, गॅस चा नंबर, पोलीस जिप चा वापर भाड्याने घर बघून देण्यासाठी वकिलांची मदत अगर पोलिसांची मदत हे सर्व प्रकार आपल्या पदाचा गैरवापर करणारे आहेत डायरेक्ट पैसे खाल्ले म्हणजेच लाचनाही आपल्या पदाचा गैरवापर करणे हा सुद्धा लाचेचाच प्रकार आहे
हा विचार करायला गेल्यास अनेक वेळा असा प्रश्न पडतो की अनेक वकील नवीन न्यायाधीश आले की त्यांना घर बघून देणे त्यांची किरकोळ कामे करून देणे हे सुरू करतात यातून पुढे त्या वकिलांनी जर आपल्या मर्यादा ओलांडल्या तर ते त्या न्यायाधीशाला पण भ्रष्ट करतात व आपणही भ्रष्ट होतात
आज न्याय खात्यामध्ये इतके अधिकार आहेत त्यांच्या हाताखाली अनेक कर्मचारी आहेत ते त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत आपली कामे करून घेऊ शकतात माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरगुती कामाला त्यांच्या त्यांच्या पदाप्रमाणे नोकर वर्ग असतो त्यांचे न्यायिक अधिकारी असतात ते सुद्धा त्यांना सहकार्य करू शकतात मदत करू शकतात त्यामुळे आपल्या खात्यातील कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य व्यक्ती, अन्य वकील यांची मदत घेऊन आपली कामे करणे ही घसरण्याची सुरुवात आहे मग ही घसरण कोठे जाऊन थांबेल हे कुणी सांगू शकत नाही
पाप तर अनेक जण करतात काहींचे पाप जाहीर होते है काहीचे लपते "किसीका छपता है किसीका छुपता" है अशी ही अवस्था आहे.
तो दिवस दूर नाही
यामध्ये जर फरक पडला नाही तर आज आगी आपोआप लागलेल्या आहेत नंतर अन्याय झालेले नागरिक अगर समाज समूह आगी लावण्यास पुढे मागे बघणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
अनिल रुईकर वकील
98 232 55 049
इचलकरंजी
हा किंवा माझे कोणतेही लेख आवडल्यास नावाशिवाय अगर नावासह पुढे पाठवण्यास हरकत लागेल
0 टिप्पण्या