सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाची नियंत्रण पॅनल मान्षु कॉमटेल प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीस भेट.
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 03/03/2025 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील पदविका इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागामध्ये विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८/०२/२०२५ रोजी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागाची औद्योगिक भेट सातारा येथील मान्षु कॉमटेल प्रायव्हेट लिमिटेड, नियंत्रण पॅनल विभागास देण्यात आली. याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्पादनाच्या विविध टप्प्यांचा अभ्यास केला डिझाईन पासून असेंब्लीपर्यंतची प्रक्रिया पाहिली. कंपनीचे प्रतिनिधी शेखर देशकुलकर्णी यांनी ऑटोमेशनच्या नवीन ट्रेड आणि औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये नियंत्रण पॅनेलच्या भूमिकेविषयी चर्चा केली. या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की त्यांना कंट्रोल पॅनलच्या कार्यप्रणाली बद्दल सखोल माहिती मिळाली. प्रत्येक यंत्रणा आणि त्यांची कार्यप्रणाली याबद्दलच्या शिक्षकांच्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप काही शिकता आलं. विविध उपकरणे त्यांची सुरक्षा प्रणाली आणि त्यांच्या वापराचे महत्त्व समजून घेतल्याने आम्हाला तंत्रज्ञानाची खरी क्षमता कशी आहे हे कळालं. या औद्योगिक भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात नक्कीच फायदा होईल . या औद्योगिक भेटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे शिक्षक व द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले व डिप्लोमा इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. कांबळे एस.एस. व प्रा. फुले पी.जी. यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
0 टिप्पण्या