प.पू. सद्गुरु मामासाहेब देशपांडे यांचा 35 वा पुण्यतिथी महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन

 प.पू. सद्गुरु मामासाहेब देशपांडे यांचा 35 वा पुण्यतिथी महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 14/03/2025 : श्रीपाद सेवा मंडळ संग्रामनगर- अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे परमपूज्य सद्गुरु मामासाहेब देशपांडे यांचा 35 वा पुण्यतिथी महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सप्ताह ( वर्ष  16 वे ) सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. दत्त मंदिर, लोणकर वस्ती,  संग्रामनगर अकलूज या ठिकाणी सोमवार दिनांक 17 मार्च 2025 ते 23 मार्च 2025 या कालावधीत संपन्न होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याचे व्यासपीठ चालक ह.भ. प. मंगेश महाराज माने - देशमुख (बोंडले, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) हे आहेत. पारायणाची सुरुवात सोमवार पासून सकाळी  8:30 वाजता होणार आहे. चहापान व अल्पोपहार सकाळी 10 ते 10:30  या वेळेत होईल. पारायण समाप्ती रविवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होईल. पुण्यकाल, पुष्पवृष्टी व किर्तन रविवारी सकाळी 10:05 ते 12 या कालावधीमध्ये ह.भ.प. मंगेश महाराज माने - देशमुख यांचे कीर्तन होईल.  त्यानंतर दुपारी 12 : 15 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप होईल. 

वाचकांनी आपली नावे अंगद महाराज हजारे (मोबाईल नंबर 83 29 52 34 25), अनिकेत शिरकांडे (मोबाईल नंबर 98 34 17 26 29) यांच्याकडे 16 मार्चपर्यंत नोंदवावीत वाचकांची संख्या पाहून बैठक व्यवस्था व ग्रंथाची सोय करण्यात येईल अशी माहिती दिलीप गजानन लोणकर (आयोजक, श्रीपाद सेवा मंडळ संग्रामनगर अकलूज) यांनी साप्ताहिक "अकलूज वैभव" आणि पाक्षिक "वृत्त एकसत्ता" ला सांगितली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या