सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम.एच.टी.- सी.ई.टी. 2025 मॉक टेस्टचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/03/2025 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये २१ मार्च २०२५ पासून प्रत्येक शनिवारी २०२५ मॉक टेस्टचे आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.या कार्यक्रमाचे आयोजन बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम.एच.टी.- सी.ई.टी.च्या परीक्षेची उजळणी व सॉफ्टवेअरचि माहिती व त्याचबरोबर परीक्षेस कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभावे या उद्धेशाने करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. देशपांडे जी.जी. व प्रा.कोकरे ए.जे. हे काम पाहत असुन सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन होत आहे.
0 टिप्पण्या