सहकार महर्षि कारखान्यातील सिझन 2024 - 2025 मधील ऊस तोडणी वाहतूकीची संपुर्ण रक्कम वाहतूकदारांचे खातेवर वर्ग...
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/03/2025 : शंकरनगर - अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे सिझन 2024-2025 मध्ये हंगाम अखेर पर्यंतची सर्व तोडणी वाहतूक बिले वाहन मालकांना आदा करणेत आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम 2024-2025 मध्ये सभासद, बिगर सभासद, दिर्घमुदत करारदार यांच्या गळीतास आलेल्या ऊसाची बिले शासनाच्या धोरणानुसार ज्या - त्या पंधरवड्यामध्ये त्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आली असून ऊस तोडणी वाहतूकीची सर्व बिले शनिवार दि.22/03/2025 रोजी वाहतूदार यांचे बँक खातेवर वर्ग करणेत आली आहेत. तरी, गळीत हंगाम 2025-2026 करीता बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार यांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतूकीचे करार करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले.
सदर प्रसंगी बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या