सहकार महर्षि अभियांत्रिकीतील पदविका विभागामार्फत उद्योजकता विकास या विषयावर गेस्ट लेक्चरचे आयोजन.

सहकार महर्षि अभियांत्रिकीतील पदविका विभागामार्फत उद्योजकता विकास या विषयावर गेस्ट लेक्चरचे आयोजन.

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 21/02/2025 : अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका अभियांत्रिकी विभागामार्फत ट्रस्टचे अध्यक्ष  जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक विकासात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून  युवा उद्योजक सुभाष काकडे (काकडे अग्रो इक्विपमेंट तांदुळवाडी) यांचे व्याख्यान संपन्न झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, सध्याच्या स्पर्धेच्या युगात अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच औद्योगिक क्षेत्राची माहिती असणे नेहमीच फायदेशीर ठरते. उद्योग या विषयावर बोलताना आपली इच्छाशक्ती बळकट करणे गरजेचे आहे तसेच, उद्योगासाठी लागणारी सामग्री कशी उभा करावी, बँके मधून लोन कसे मिळवावे,  ग्राहक कसा मिळवावा तसेच व्यवसाय वाढीसाठी काय आवश्यक आहे  या बद्दल मार्गदर्शन केले.

सदर सत्रासाठी  महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख तसेच विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तावना प्रा.पांढरे व्ही.बी. यांनी केले तर आभार प्रदर्शन पदविका मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. स्वप्नील निकम यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.पल्लवी फुले व प्रा.हितेज यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या