"चौंडी येथे मंत्रीमंडळ बैठक घ्यावी" - खा. धैर्यशिल मोहिते-पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/02/2025 : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षा निमित्त महाराष्ट्रात विविध उपक्रम साजरे होत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि धनगर समाज तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी, चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
मध्य प्रदेश सरकारने माहेश्वर (इंदोर) येथे मंत्रीमंडळ बैठक घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारशाला सन्मान दिला. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही चौंडी येथे बैठक घेऊन सर्व सर्व समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे निर्णय घ्यावे हिच सरकारच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांना खरे अभिवादन ठरेल असे खासदार मोहिते-पाटील मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
0 टिप्पण्या