सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अटल इनक्युबेशन सेंटर बारामती येथे भेट संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/02/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट इनोवेशन सेल अंतर्गत स्टार्ट अप बिझनेस आयडिया बद्दल माहिती मिळवण्यासाठी प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या अंतर्गत नीती आयोगाने तयार केलेल्या अटल इनक्युबेशन सेंटर - ए.आय.सी. – ए.डी.टी. बारामती फाउंडेशन बारामती येथे औद्योगिक भेट आयोजित केली होती.
त्यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण सेंटरची संपूर्ण माहिती इनक्युबेशन सेंटरचे मॅनेजर अभिषेक गीते आणि टेक्नॉलॉजी मॅनेजर अविनाश कुदाले यांनी इंटरप्रनर्शिप अँड सपोर्टस एग्रीकल्चर स्टार्टअप्स बद्दल माहिती व आतापर्यंत तयार केलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प व त्यासाठी लागणारे सर्व यंत्रसामुग्री बद्दल माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे सिविल डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रा. सागर फुले व समन्वयक म्हणून प्रा. अनिल कोकरे यांनी काम पाहिले.
0 टिप्पण्या