महाशिवरात्री निमित्त शिवपार्वती मंदिरात अभिषेक, महापूजा, आरती सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/02/2025 : महाशिवरात्रीनिमित्त शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरात आमदार रणजीत सिंह विजयसिंह मोहिते पाटील व सौ सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्त भाविकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर अकलूज परिसरातील सर्व महादेव मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.
शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरात अभिषेक महापूजेनंतर महाआरती करताना आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील ,कु. इशिता धैर्यशिल मोहिते पाटील
महाशिवरात्रयात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही 'महाशिवरात्र यात्रा महोत्सव भरविण्यात आला असून कृषी व औद्योगिक प्रदर्शन, पीक स्पर्धा, दुग्ध स्पर्धा, जनावरांचा बाजार व जंगी निकाली कुस्तीचे मैदान आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अकलूज येथील बसवेश्वर चौकातील महादेव मंदिर, मलिकार्जुन मंदिर व बुरजा महादेव मंदिरात तसेच नऊचारी नजीक खाडे यांच्या शिवमंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृताचे ग्रंथाचे पारायण, अभिषेक पूजा व आरती या सह विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांनी 'हर हर महादेव' चा गजर केला.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही 'शिवतीर्थ' आखाड्यात जंगी निकाली कुस्त्याचे मैदान गुरूवार (ता.२७) रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, राजेंद्र चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
0 टिप्पण्या