एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 17/02/2025 : अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या 74 व्या दीक्षांत समारंभाचे  थेट प्रक्षेपनाचे आयोजन विद्यार्थिनी व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी करण्यात आले होते. एन. डी. टी. वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई, येथे पाटकर हॉलमध्ये आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी 74 वा दीक्षांत समारंभ पार पडला. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्योती पारीख या होत्या. तर अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन हे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. ऋषी गजभिये यांनी दीक्षांत समारंभाचे महत्व व भूमिका विषद केली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन परीक्षा विभाग प्रमुख डॉ. जयशिला मनोहर यांनी केले. आभार प्रदर्शन कु. प्रगती शेटे हिने केले. याप्रसंगी डॉ. अमित घाडगे, डॉ. छाया भिसे, डॉ. राजश्री निंभोरकर व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या