एकात्मिक बालविकास प्रकल्प माळशिरस बीट मध्ये आरंभ पालक मेळावा संपन्न

 एकात्मिक बालविकास प्रकल्प माळशिरस बीट मध्ये आरंभ पालक मेळावा संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28/02/2025 : एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी पश्चिम सोलापूर अंतर्गत माळशिरस बीट मध्ये आरंभ पालक मेळावा संपन्न झाला. हा पालक मेळावा मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी, वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या स्टॉलची निर्मिती करुन मुलांचा बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.  आरंभ म्हणजे सुरुवात. सुरुवात ही मुलांच्या जीवनाची व्यवस्थित झाली तर जीवनात मुले खूप काही करू शकतात व खूप चांगले होऊ शकतात. मुलांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आलेत.मुलांना सकसआहार दिला पाहिजे गरोदर माताची काळजी घेतली पाहिजे या साठी चे मार्गदर्शन करण्यात आले. मुलांना काय खायला द्यावे काय खायला देऊ नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या आरंभ मेळाव्यात भारतीय संस्कृतीचे सण कसे असतात.ते केव्हापासून सुरु होतात याची माहिती मुलाना करून देण्यात आली. यामध्ये 1 ते 25 स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. बोगदा, पाळणा घर, भातुकलीचा संसार, पाण्याचे खेळ, सकास आहारा विषयी मार्गदर्शन, प्रदूषणाविषयी मार्गदर्शन, सेल्फी पॉईंट, दळणवळणांच्या साधनांचे प्रदर्शन, टिकली  लावणे, भविष्याचे झाड मेंदूचे जाळे असे विविध उपक्रम राबवण्यात आले.


 हा आरंभ मेळावा यशस्वीपणे होण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव साहेब मुख्य सेविका सणगर  यांनी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले.   प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभाग विस्ताराधिकारी माळशिरस सुषमा महामुनी, वक्ता म्हणून माळशिरच्या रूपाली मदने,  आरोग्य विभाग अधिकारी  डॉ. काळे, माळशिरस पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल ज्योती पवार, नगरसेविका रेश्मा टेळे, नगरसेविका प्राजक्ता ओहोळ, पालक वर्ग, विद्यार्थी, तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या उपस्थितीत आरंभ पालक मेळावा संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या