उद्या ( दि. सात फेब्रुवारी रोजी) अकलूज येथे 'सहकार महर्षि केसरी' बैलगाडा शर्यतीचे आयोजन

 

उद्या ( दि. सात फेब्रुवारी रोजी) अकलूज येथे 'सहकार महर्षि केसरी' बैलगाडा  शर्यतीचे आयोजन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 06/02/2025 : श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने 'सहकार महर्षि केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत' शुक्रवार दिनांक 7 रोजी सकाळी  क्रीडा संकुल समोरील पटांगणात होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मदनसिंह मोहिते पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व ट्रस्टी ॲड. नितीन खराडे, तुकाराम जाधव, चंद्रकांत कुंभार, संतोष माने, श्रीकांत राऊत, वसुंधरा देवडीकर, शाहिनाज शेख उपस्थित होते.


या शर्यतीत ५०० पेक्षा अधिक बैलगाड्या सहभागी होतील. शर्यतीत प्रथम पारितोषिक १.५ लाख रुपये रोख व चषक, द्वितीय १ लाख १० हजार, तिसरे ७५ हजार, चौथे ६० हजार, पाचवे ५० हजार, सहावे ३० हजार, सातवे २० हजार, आठवे १० हजार व चषक आणि सेमी फायनल मध्ये दोन नंबर उतरणाऱ्या गाडीस योग्य बक्षीस दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला सहभागाचे प्रशस्त्रीपत्रक देण्यात येणार आहे.

बैलगाडा शर्यतीत विजेत्या बैलगाडा मालकास रोख रक्कम व चषक दिले जाते परंतु जिंकून देणाऱ्या बैलांना काहीच दिले जात नाही मात्र या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या बैल जोडीला मेडल, झूल व महर्षीचषकाचे बाशिंग देऊन बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी शनिवार दिनांक 25 जानेवारी सुरू झाली असून गुरुवार दिनांक 6  फेब्रुवारी पर्यंत सकाळी नऊ ते पाच या वेळेत घेतली गेली.  ऑफलाइन नोंदणी घेतली जाणार नाही असे जाहीर करण्यात आले होते. स्पर्धेसाठी गट गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात नंतर काढले गेले.

बैलगाडा शर्यत प्रेक्षकांना पाहता यावी यासाठी गॅलरी तसेच महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लाईट, पाणी, वाहनतळ आदींची सोय केली असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याचे  श्री मोहिते पाटील यांनी सांगितले.

शर्यतीचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी सहकार महर्षि साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर तसेच अर्जुनसिंह मोहिते पाटील व बैलगाडी शर्यतीच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

"बैलगाडा शर्यतीत विजेत्या बैलगाडा मालकास रोख रक्कम व चषक दिले जाते परंतु जिंकून देणाऱ्या बैलांना काहीच दिले जात नाही मात्र या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या बैल जोडीला मेडल, झूल व महर्षि चषकाचे बाशिंग देऊन बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे".

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या