इयत्ता दहावी बोर्ड परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

इयत्ता दहावी बोर्ड  परीक्षार्थींचे  गुलाब पुष्प देऊन स्वागत 

वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 21/02/2025 : 

सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे दहावीची बोर्ड परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र सदाशिवराव माने विद्यालय अकलूज असून या केंद्रात सुमारे 494 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी  व्यवस्था याचा  बंदोबस्त करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त व आनंदाने परीक्षेला सामोरे जावे याकरिता विद्यालयाच्या वतीने परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. याप्रसंगी संचालक उत्कर्ष शेटे, आप्पासाहेब मगर, एड. रणजितसिंह माने देशमुख,  मुख्याध्यापक अमोल फुले, दत्तात्रय घंटे, टी वाय शिंदे, सादिक झारेकरी, झाकीर सय्यद या मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी  विद्यालयातील शिक्षक शिक्षिका  उपस्थित होते.


शाळेच्या नोटीस बोर्डवर परीक्षेसाठीचा बैठक क्रमांक शोधण्यासाठी परीक्षार्थींची उडालेली उत्साह पूर्ण झुंबड - फोटो : शकूर तांबोळी अकलूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या