मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/02/2025 : जीवनात आपल्याला जशी इतरांची मदत हवी असते तशी आपणही इतरांना उपयोगी पडले पाहिजे. एकमेकांना सहाय्य करणे, संकटकाळी धावून जाणे ही खरी माणुसकी असते. ईश्वरसेवा म्हणजे हेच नव्हे का?
मदतीचे स्वरूप नेहमी पैसेच असे नसते. कोणाला सल्ला हवा असतो, कोणाला मन मोकळे करण्यासाठी हक्काची व विश्वासाची व्यक्ती हवी असते तर कोणाला आपला थोडा वेळ हवा असतो. मात्र देणाऱ्याने ती मदत मनापासून करणे महत्त्वाचे असते.
अनेकदा एखाद्याला भीक स्वरूपात मदत करणे, त्याला उपकाराची भाषा ऐकवणे, रागावून किंवा चिडून बोलणे, मदत केलेली सर्वांना सांगत बसणे किंवा ज्याला मदत केली त्याला उपकाराच्या ओझ्याखाली ठेवणे या गोष्टी पूर्णपणे अयोग्य आहेत.
*आजचा संकल्प
समोरच्या व्यक्तीला प्रेमाने, आपुलकीने, विचारपूस करून त्याला हवी ती व आपल्याला शक्य असेल ती मदत अगदी सहज भावनेने करू व माणुसकीचे नाते जपू._
सौ. स्नेहलता स. जगताप
0 टिप्पण्या