परिस्थितीवर मात करून सुनिता झाली अधिकारी
वृत्त एकसत्ता न्यूज
माळशिरस प्रतिनिधी : 15/02/2025 : MPSC परीक्षेत उत्तुंग यश मिळवत सुनिता बापू वाघमोडे या पाटीलवस्ती, शाळेच्या विध्यार्थीनीने ग्रामीण तसेच शहरी विध्यार्थ्यांच्या समोर आदर्श निर्माण केला. कौटुंबिक हलाखीची परिस्थिती, लहान असतानाच वडिलांचे निधन झालेले, शिक्षणासाठी लहान भावांनी दिलेलं पाठबळ, आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुबंई, पुणे यासारख्या शहरात न राहता, आपल्या माळशिरस अभ्यासिका मधून व घरीच अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा अयोगची परीक्षा दिली, या सर्व परिस्थिती वर मात करत उत्तुंग यश संपादन केले.
प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवस्ती येथे आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी यश संपादन केलेल्या सुनिता बोलत होत्या. या शाळेची मी माजी विद्यार्थिनी असून मला जिल्हा परिषदेच्या शाळेतील शेंडे सरांनी मार्गदर्शन केले त्यामुळेच आज मी या पदापर्यंत पोहोचू शकले असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.शोभा तानाजी वाघमोडे यांनी त्यांचा हार फेटा व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांनीही त्यांचे अभिनंदन व कौतुक केले तसेच माळशिरस तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तानाजीराव वाघमोडे यांनीही त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारप्रसंगी माळशिरस मधील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग, शाळेचे विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती गायकवाड, निकम व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अंगणवाडी सेविका जगताप हे उपस्थित होते.
या यशाबद्दल सुनीताचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या