🔰 शेळ्या मेंढ्यांच्या चोरी प्रकरणाची तक्रार घेण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर कार्यवाही करावी - संजय वाघमोडे 🟨 'यशवंत क्रांती' चे पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना निवेदन.

🔰 शेळ्या मेंढ्यांच्या चोरी प्रकरणाची तक्रार घेण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर कार्यवाही करावी - संजय वाघमोडे

🟨 'यशवंत क्रांती' चे पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर  यांना निवेदन. 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/02/2025 : शेळ्या-मेंढ्या चोरी झाल्यानंतर  तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या शेळ्या- मेंढपाळांची तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर कार्यवाही करणेत यावी. अशी मागणी संजय वाघमोडे शिष्टमंडळाच्या वतीने  केली. तसे निवेदन संघटनेच्या वतीने पोलीस महानिरीक्षक,कोल्हापूर सुनिल फुलारी  यांना देण्यात आले आहे. शिष्टमंडळात  कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, शाहुवाडी तालुका युवक अध्यक्ष संजय डफडे, इत्यादी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. 

 यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि  गेल्या दोन-तीन वर्षात कोल्हापुर, सांगली जिल्ह्यासह आपल्या परिक्षेत्र कार्यक्षेत्रात  शेळ्यामेंढ्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन-तीन  गुन्हे नोंद आहेत. परंतु यातील कोणत्याही चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडलेले नाहीत व चोरीला गेलेल्या शेळ्या मेंढ्या मालकांना परत मिळालेल्या नाहीत. किंवा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला  नाही. शेळ्या मेंढ्यांची चोरी झाल्यानंतर मेंढपाळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर त्यांना थांबवून ठेवले जाते. व चोर असल्यासारखे त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून  तक्रार दाखल न करताच परत पाठवले जाते. राहुल राजाराम हरुगडे मु. पो. आळसंद ता. खानापूर जि. सांगली येथील रहिवासी असून ते शेती करतात. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून  शेळीपालन केले आहे.  गुरूवारी दि. ३०/१/२०२५ रोजी रात्री नेहमीप्रमाणे  ११.३० वाजता इतर जनावरांना वैरण घालून शेळ्यांना शेडमध्ये घालून शेडला कुलूप लावून झोपी गेले. शुक्रवार दि ३१/१/२०२५ रोजी पहाटे ४.३० वा. नेहमीप्रमाणे उठल्यावर  शेडमधील  बंदिस्त करून ठेवलेल्या ६ शेळ्या व २ बोकड अशा एकूण आठ शेळ्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पहाटे पाच वाजता विटा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने  तक्रार दाखल करून न घेताच आम्ही माणसेच आहोत, येवढ्या पहाटे आम्ही काय करणार ? १० वा. या. असे सुनावाले व त्यांना कडेगावचा बाजार शोधायला सांगितले. जर पोलिसांनी त्यांची सकाळी तक्रार घेऊन पेट्रोलिंग करणाऱ्या पथकास कळवून जलदगतीने  सीसीटीव्ही कॅमेरे पाहून तपास सुरू केला असता तर गुन्हेगार रंगेहात सापडले असते. परंतु पोलिसांनी  तक्रार दाखल करून घेतली नाही. 

या संदर्भात यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी शनिवारी आळसंद येथे घटनास्थळी भेट दिली. व घटनास्थळवरुनच विटा पोलीस स्टेशनला फोन करून या संदर्भात विचारले असता पोलिसांच्या कडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फडतरे  यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून तक्रार दाखल करून न घेतल्याबद्दल विचारणा केली असता व पोलीसांच्या कडून गोरगरिबांना मिळणाऱ्या वागणूकी संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर शनिवारी दुपारी तक्रार दाखल करुन घेण्यात आली. तक्रार दाखल करण्यासाठी मेंढपाळ पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांना दिवस दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते. उलट त्याच्या वर प्रश्नांची सरबत्ती करून परत पाठवून दिले जाते.त्यामुळे चोरी झाली तरीही शेळ्या मेंढ्याचे मालक तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. तक्रार दाखल केली तरीही गुन्हेगार सापडत नाही. सखोल तपास होत नाही. यामुळे गुन्हेगार निडर होऊन ते आत्ता १०,२०,३०, शेळ्या मेंढ्यांच्या संपूर्ण कळपच चोरी करून वाहनातून घेऊन जात आहेत.

 "आपली कामगिरी खूप मोठी आहे. आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल आपणास राष्ट्रपती पदक मिळाले आहे त्याबद्दल आपले संघटनेच्या वतीने अभिनंदन! कृपया आपण शेळ्या मेंढ्या चोरी प्रकरणात लक्ष घालून सर्व गुन्ह्यांच्या तपास करण्यात यावा.व आरोपींना शोधून कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.जेणेकरून  शेळ्या-मेंढ्या चोरण्याचे आरोपींचे धाडस होणार नाही व चोरी झाली तर शेळ्या मेंढपाळांची तक्रार तातडीने दाखल करून घेतील. याबाबत आपल्या परिक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांना सुचना देण्यात याव्यात. गरीब मेंढपाळ भटकंती करून मेंढ्याच्या जीवावरच आपला संसाराचा गाडा चालवतात व त्यांचे संपूर्ण संसार शेळ्या-मेंढ्यांच्या उत्पन्नावर चालतात तरी  आपण सदर प्रकरणात आपण लक्ष घालून आम्हास न्याय मिळवून द्यावा." अशी विनंती निवेदनामध्ये शेवटी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या