जि .प .प्रा. आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

जि .प .प्रा. आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.

वृत्त एकसत्ता न्यूज

सुजाता गोखले

माळशिरस 04/02/2025 : आज जि .प. प्रा. आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे हळदीकुंकू व माता पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली.  यावेळी सर्व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

सूर्यनमस्कार, प्राणायाम, स्वतःसाठी वेळ काढा,मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारा. वयात येणाऱ्या मुलींसोबत मैत्रिणीसारखे वागा. असे मोलाचे मार्गदर्शन हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त माळशिरस पंचायत समिती तालुक्याच्या विस्तार आधिकारी सुषमा महामुनी व माळशिरसच्या नगरसेविका सौ.रेश्मा टेळे  यांनी उपस्थित महिलांना केले. 

महिलांच्या उखाणे व संगीत खुर्ची या स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सौ. सुवर्णा गोरे, श्रीम.सोनी कानडे, श्रीम.राणी झुंजरुक,श्रीम.पुष्पांजली शिखरे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या