श्रद्धा कम्प्युटर एज्युकेशनची
वाटचाल ; यशस्वी पूर्तीची 26 व्या वर्षाकडे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/02/2025 : एकविसावे शतक हे संगणकाचे शतक म्हणून ओळखले गेलेय. सदाशिवनगर व परिसरातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान गावामध्येच उपलब्ध व्हावे. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधीलकी म्हणून आदरनीय मा. श्री अनंतलालदादा दोशी मा.श्री विरकुमारभैया दोशी यांच्या संकल्पनेतून दिनांक 4/2/2000 रोजी श्रद्धा कम्प्युटर एज्युकेशन या कम्प्युटर इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. या इन्स्टिट्यूटला आज 25 वर्ष पूर्ण होत आहे.. याचा मला अभिमान असून एका छोट्याशा विचाराने आज 25 वर्षे पूर्ण झाली. या इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक साक्षर केलं. एम एस सी आय टी, टॅली, डीटीपी, हार्डवेअर इत्यादी सारखे कोर्स या सेंटरमध्ये राबवण्यात येत असून सद्या महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचा टायपिंग कोर्स सुद्धा येथे सुरू आहे. या माध्यमातून संगणक साक्षर होत असून. अनेक विद्यार्थी शासकीय, निमशासकीय, तसेच आपल्या व्यावसायिक, व्यक्तिगत जीवनात याचा वापर करत आहेत. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानदानाची शिदोरी या केंद्राचे व्यवस्थापक आनंद शेंडगे यांच्यासह अनेक माझ्या मित्र परिवार कडून या प्रवासामध्ये सहकार्य लाभले या सर्वांच्या ऋणात मी राहणं पसंत करतो पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद!
प्रमोद अनंतलाल दोशी
संस्थापक अध्यक्ष
0 टिप्पण्या