काव्य विश्व........✍️
जपता येते
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 1 जानेवारी 2025 :
जपता येते
नववर्षाला गाता येते
सरल्या संगे रमता येते
जुन्या चुकांची नको उजळणी
साधे सिंपल जगता येते
इतिहासाचे पान उलटले
खूणा त्यातल्या वाचून घेते
नव्या घेऊनी दिनदर्शिका
उभारीने मन जपता येते
दिले घेतले कशास आठवू
परंपरा दानाची स्मरते
सरसर सरकत काळ चालला
त्यांच्या पुढती विनम्र होते.
जुने टिकावे,नवे स्फुरावे
एकसंघता रुजवता जाते
हास्याच्या मोहक चेह-याने
नाते मनूला जपता येते
सौ.मानसी जोशी
ठाणे.
0 टिप्पण्या