विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 1 जानेवारी 2025 :

२०२५ या नव वर्षात आपण काय संकल्प करणार? आपले आरोग्य, आपले व्यक्तिमत्व सुधारण्याच्या दृष्टीने आपल्या आवाक्यात असणारे आणि आपण पूर्ण करू शकू असे काही संकल्प करू.

भारत माझा देश आहे आणि मी देशाचा आहे, सर्वप्रथम हे लक्षात घेऊ. माझ्या  देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या माझे फौजी बांधव व त्यांच्या कुटुंबीयांशी मी आदराने व आपुलकीने  वागेन. त्यांचा मान राखणे हे माझे आद्य कर्तव्य असेल.

आयुष्यभर सदैव आपण या भावनेतूनच आपले विचार व आचार ठेवलेत तर तुम्हाला इतर वेगळे काही शिकवण्याची व सांगण्याची गरज नाही. पुन्हा एकदा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

जयहिंद!🇮🇳

_- सौ. स्नेहलता स. जगताप._

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या