सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमा विभागीय स्पर्धा संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमा विभागीय स्पर्धा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 25/01/2025 : 

अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  इंटर इंजिनिअरिंग स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) ‘सी’ झोन विभागातील वेटलिफ्टींग व कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, सदर स्पर्धेसाठी विभागातील १२ महाविद्यालयातील ४९ विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टींग तर ४२ विद्यार्थ्यांनी कुस्ती या क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदविला.

वेटलिफ्टिंग या स्पर्धेमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज मधील तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील   प्रथमेश माने देशमुख यांनी ८५ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक, तसेच इलेक्ट्रिकल विभागातील  शुभम भोसले यांनी ७७ किलो वजनी  गटामध्ये प्रथम क्रमांक, तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील प्रतीक पवार यांनी ७२ किलो गटामध्ये मध्ये द्वितीय क्रमांक, तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील प्रणव जाधव यांनी ६२ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे व तृतीय वर्ष कॉम्प्युटर  विभागातील   शिवतेज माने देशमुख यांनी ९५ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तसेच कुस्ती या स्पर्धेमध्ये ८६ किलो वजनी गटामध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील  विध्यार्थी चि. प्रथमेश तानाजी माने देशमुख याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच बरोबर , प्रथम वर्ष मेकॅनिकल विभागातील   संस्कार चव्हाण यांनी ६५ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते -  पाटील व महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते - पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले यांनी विशेष कौतुक केले.

 स्पर्धेवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, क्रीडा समन्वय प्रमुख प्रा. मारुती शेंडगे, कार्यालयीन अधीक्षक श्री. शब्बीर शेख, सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  आदी उपस्थित होते. स्पर्धा  व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे सुयोग्य मार्गदर्शन व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या