राजमाता जिजाऊ जयंती व छत्रपती थोरले शाहू महाराज राज्यभिषेक सोहळा यवत येथे भव्यतेने संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13 जानेवारी 2025 : राजमाता जिजाऊ जयंती व छत्रपती थोरले शाहू महाराज राज्यभिषेक सोहळा यवत येथे भीमथडी चे भागातील राजेभोसले शाखांचे वशंज व भिमथडी चे भागातील सरदार वशंज यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
१२ जानेवारी १७०८ साली अजिंक्यतारा येथे छत्रपती संभाजी महाराज व येसुबाई साहेब यांचे पुत्र यांनी १७ वर्षे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर स्वत:चा राज्यभिषेक करून घेतला व स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करण्याला सुरवात केली. १७४९ साली छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या मृत्यू समयी मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर इतका विस्तृत केला होता. अखंड हिंदुस्थान वर ४२ वर्षे राज्य करणारे मराठा छत्रपती यांचे साम्राज्य ची लढाईची सुरवात ही भिमथडी च्या खेड ता कर्जत या गावात महाराणी ताराबाई साहेब व शाहू महाराज यांच्यात झाली . हा भिमथडीचा भाग हा राजे भोसले घराण्याचा मुळ पाटीलकीचा यामधे मालोजीराजे व विठोजी राजे यांच्या पुढील पिढ्यांचा वंश विस्तार देऊळगाव राजे, खानोटे, जिंती, हिंगणी-बेर्डी , राजेगाव, शेडगाव, पेडगाव, भांबोरा वडाळी कळस , असा दौड, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नगर, इंदापूर तालुक्यातील व पुणे नगर सोलापूर जिल्ह्यातील वंश विस्तार असणाऱ्या या राजे भोसले शाखा आहेत.
राजमाता जिजाऊ जयंती व छत्रपती थोरले शाहू महाराज राज्यभिषेक सोहळ्यामध्ये या शाखांचे आजचे वशंज उपस्थित होते. यामध्ये या कार्यक्रमाचे व उपस्थित राजे भोसले परिवारातील जेष्ठ सदस्य भरतराजे राजे भोसले कळस शाखा व त्यांचे पुतणे निखिलराजे राजेभोसले, छत्रपती शाहू महाराज यांचे सुपा परगणा प्रमुख राजजी भोसले यांचे वंशज सुनिलराजे राजेभोसले, वावीकर शाखेचे सागरराजे राजेभोसले उपस्थित होते ज्या वावीकर शाखेतून सातारा गादीवर दोन छत्रपती म्हणून दत्तक घेतले गेले याच शाखेचे सेनापती चतुरसिंह राजेभोसले यांनी पेशवे यांच्या कडून कारभार काढून पुन्हा छत्रपती यांच्या कडे राज्यकारभार यावा म्हणून देशभर फिरून मराठा संस्थानिक एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता जो यशस्वी झाला नाही. मराठा इतिहास मधील कोणतीही घटना खरी खोटी याची शहनिशा शेडगावकर बखर मधे तपासून केली जाते अशा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शाखेचे प्रकाशराजे राजेभोसले व विजयराजे राजेभोसले , वांभोरा कर्जत शाखेचे प्रविण राजेभोसले, हिंगणीकर शाखेचे अशोकराजे राजेभोसले उपस्थित होते. यावेळी विशेष उपस्थिती ही जत सांगली चे डफळे सस्थांन चे युवराज शाहूराजे डफळे सरकार उपस्थित होते. तसेच भीमथडीचे सरदार घराण्यातील आवजीराव कवडे यांचे वशंज जीवनराव कवडे, बाजीराव प्रधान यांचे कुटुंब हिंगणगावचे गढीत कोडूंन ठेवणारे भीमथडीचे सरदार दामाजी थोरात यांच्या सोबत असणाऱ्या बोरीआंदी ता. दौड मधील येसाजी गायकवाड यांचे आजचे वंशज रुषीकेष गायकवाड , बाळकृष्ण भापकर चौधरवाडी ता बारामती भापकर सरदार यांचे वशंज , पेडगाव ता. श्रीगोंदा चे इतिहास प्रेमी लक्ष्मण नाईकवाडी , ऊरुळी कांचन चे इतिहास प्रेमी व लेखक खलील शेख , निसर्गोपचार तज्ञ धनराज गावडे , गोसेवक अशोक गावडे, पोलिस अधिकारी रविंद्र जाधव , सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (अकलूज), बाळासाहेब मगर (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस आय) , असे मान्यवर उपस्थित होते , छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या बाबत इतिहास अभ्यासक मंगेश गावडे पाटील यांनी व्याख्यान केले व या सोहळ्याचे आयोजक दोरगे शिलेदार परिवार यांचे घराणे बाबत राहुल दोरगे यांनी माहीती दिली, वांभोरा शाखेचे प्रविण राजे भोसले यांनी भीमा नदीच्या भागातील राजेभोसले शाखांचा सविस्तर विस्तार व कार्य याबाबत माहिती दिली, वावीकर राजेभोसले सागरराजे राजेभोसले यांनी दुसरे शाहू अर्थात जंगली महाराज यांच्या बाबत माहिती दिली , सुनिलराजे राजेभोसले यांनी राज्यभिषेक सोहळा आयोजित करून राजेभोसले परिवार आमंत्रित करण्यात येतो याबाबत दोरगे परिवाराचे कौतुक व समाधान व्यक्त केले, शेडगावकर शाखेचे विजयराजे राजेभोसले यांनी शेडगावकर शाखेचे इतिहास बाबत माहिती दिली व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या बाबत अप्रकाशित ऐतिहासिक पत्रे लवकरच प्रसिद्ध करू असे सांगितले,
कळस शाखेचे भरतराजे राजेभोसले यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या शाखाचे दहा राजे भोसले एकत्र करून भिमथडीचे भागात हा सोहळा साजरा करता आहात याचे मला कौतुक वाटते आहे असे कौतुक केले, आजचे काळात जातीपातीच्या राजकारण मधे पडू नका समाजकार्य करताना जात पाहू नका सर्व लोक सारखे आहेत सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा तरूणांनी उद्योग व्यवसाय मधे उतरा मी तुम्हांला आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सोबत आहे. असे आवाहन केले . यावेळी सोहळ्यात हभप महाराज नानासाहेब दोरगे पाटील, दादासाहेब माने, अण्णा दोरगे, आबासाहेब दोरगे, बाळासाहेब दोरगे, गणेश दोरगे, अमर शिंगटे, सचिन उतेकर बांदल पाटील, किरण काळभोर, शुभम दिवसे, आदेश दोरगे, समस्त दोरगे शिलेदार परिवार, दैनिक केसरी चे पत्रकार अमोल भोसले, नाटकर सतर्क सह्याद्री संपादक, काशिनाथ पिंगळे संपादक- डिजिटल महाराष्ट्र न्यूज, अनिल गायकवाड उपस्थित होते.
0 टिप्पण्या