सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/01/2025 : अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते - पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख व प्राध्यापक वर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे म्हणाले की, भारत देशाच्या स्वातंत्र्य मिळविण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोलाचे योगदान होते त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली व तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा असा नारा दिला होता. महाविद्यालयामध्ये नेहमीच थोर महापुरूषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येतात. आजच्या पिढीला महापुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी सर्व विद्यार्थ्यांनी या थोर महापुरूषांचा आदर्श घ्यावा. यावेळी सर्व विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. कोकरे यांनी केले.
0 टिप्पण्या