💢 मानव अधिकार संरक्षण समिति नवी दिल्लीच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस तरीही प्रशासन सुस्त

💢 मानव अधिकार संरक्षण समिति नवी दिल्लीच्या  

आमरण उपोषणाचा पाचवा दिवस तरीही प्रशासन सुस्त

वृत्त एकसत्ता न्यूज

मुंबई दिनांक 24/01/2025 :

मानव अधिकार संरक्षण समिति नवी दिल्ली च्या वतीने यवतमाळ येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस असूनही  प्रशासन मात्र सुस्तच असल्याचे चित्र आज दिनांक 24 जानेवारी च्या दुपारपर्यंत होते. 

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे राष्ट्रिय अध्यक्ष डॉ. भगवान भाई दाठिया, गजानन भगत (जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य) यांचे मार्गदर्शना खाली दिनांक २० जानेवरी 2025 पासून मानव अधिकार संरक्षण समिति नवी दिल्ली तर्फे विदर्भ अध्यक्ष  देवराव राठोड व महाराष्ट्र उप सचिव सौ. सरला इंगळे यांच्या नेतृत्वात आझाद मैदान यवतमाळ येथे जिल्हा अध्यक्ष मधुकर विठ्ठलराव मडावी हे आमरण उपोषणाला बसले आहेत. 



 १) प्रणित मोरे व इतर अटक झालेल्या संचालक मंडळाची चल अचल मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात याव्या. २) जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस येथे शासकीय प्रशासक यांची नियुक्ती करण्यात यावी.३) जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस अंतर्गत येत असलेल्या सर्व शाखेचे शाखा प्रबंधक व्यवस्थापक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. या प्रमुख मागण्यासाठी उपोषण सुरू असून या ठिकाणी सौ. सरला दिलीप इंगळे, सौ दुर्गा मिश्रा, राजेंद्र आनंदराव चिरडे, गुलाबरावजी राऊत, मधुकर विठ्ठलराव मडावी, संतोष सदाशिव दुधे, दया शंकर पंचोले, देवरावजी राठोड, देवसिंग जी राठोड, संजय शिवराम, संगीता सरोदे इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या