उज्जैनकर फाउंडेशनच्या आळंदी संमेलनाची पत्रकार परिषद संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 3 जानेवारी 2025 :
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर (ता. मुक्ताईनगर जिल्हा जळगाव) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तर श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या सौजन्याने शनिवार दि. 4 जानेवारी 2025 रोजी तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन मोरया मंगल कार्यालय, नवीन पुलाजवळ आळंदी देवाची येथे आयोजित करण्यात आलेले आहे. त्या संदर्भातील पत्रकार परिषदेचे आयोजन नुकतेच आराधना हॉटेल या ठिकाणी करण्यात आले होते. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष बागल, श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर व संमेलनाचे निमंत्रक तथा श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार डॉ.ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुरेंद्र हेरकळ यांनी संमेलनाची पत्रिका वाचून दाखवली तर आदिशक्ती मुक्ताई कडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना 750 व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्त 750 फुटाची व 101 किलो वजनाची राखी बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या राखीची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व लिमका बुक मध्ये करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर यासंबंधीचे संमेलनाचे मुख्य आयोजक तथा उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी उज्जैनकर फाउंडेशनचे गेल्या 15 वर्षातील कार्याचा आढावा दिला. हे संमेलन पुण्यनगरी आळंदी येथे होत असल्याने आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावन भूमीतून मराठी भाषा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य सुरू असून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामध्ये आणि गोवा राज्यामध्ये सुद्धा फाउंडेशनचे संमेलन यशस्वी करण्यात आलेले आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये साहित्य नगरीमध्ये हे संमेलन आयोजित असल्याने उज्जैनकर यांनी आळंदीकर वासियांचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित पत्रकार बंधूंना मान्यवरांनी संमेलनाच्या संदर्भामध्ये आणि उज्जैनकर फाउंडेशनच्या संदर्भात माहिती दिली व सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंचे मुक्ताईचे चरित्र पुस्तक, मुक्ताईची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. सकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित या संमेलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी फाउंडेशनचे राज्य सल्लागार तसेच संमेलनाचे सहकार्याध्यक्ष रामचंद्र कुऱ्हाडे पाटील, संमेलनाच्या निमंत्रक फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा सौ. रुपालीताई चिंचोलीकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बुडूखले, पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पुणे येथील श्रीरामचंद्र गुरव, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पोतदार, विदर्भ विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहरराव पवार, बुलढाणा जिल्हा सदस्य डॉ. निवृत्तीभाऊ जाधव आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विकास शिवले यांनी केले तर फाउंडेशनचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार अर्जुन मेदनकर यांनी आभार मानले. या संमेलनाला फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैन कर यांनी या प्रसंगी सांगितले.
0 टिप्पण्या