हिंदूंनी इंग्रजी भाषा वापरताना कराव्या व करू नयेत अशा १० गोष्टी - फ्रान्स्वा गोतिये (Francois Gautier)

 

हिंदूंनी इंग्रजी भाषा वापरताना कराव्या व करू नयेत अशा १० गोष्टी - फ्रान्स्वा गोतिये (Francois Gautier)

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 01/12/2024 : फ्रान्स्वा गोतिये हे भारतात स्थायिक असलेले पत्रकार असून, अनेक नामांकित फ्रेंच वृत्तपत्रांचे "दक्षिण आशियाचे" प्रतिनिधी राहिले आहेत. हिंदू धर्माबद्दल त्यांचे विचार व ज्ञान हे सर्वसामान्य हिंदूंपेक्षा अधिक व्यापक आहे.

१.कृपया "God fearing" हा शब्द वापरणे थांबवा. हिंदू कधीही देवाला घाबरत नाहीत. आपल्यासाठी देव सर्वत्र आहे आणि आपणही देवाचा एक भाग आहोत. देव वेगळा अस्तित्व नाही ज्याला घाबरावे लागेल.

२.कोणी निधन पावल्यावर "RIP" हा शब्द वापरू नका. त्याऐवजी "ॐ शांती", "सद्गती" किंवा "या आत्म्यास मोक्ष / सद्गती / उत्तम लोक मिळो" असे म्हणा. हिंदू धर्मात "soul" किंवा त्याच्या "resting" चा विचार नाही. "आत्मा" व "जीव" हे "soul" या शब्दाच्या जवळजवळ विरुद्ध अर्थाचे आहेत.

३.रामायण व महाभारत या आपल्या ऐतिहासिक महाकाव्यांना "Mythology" असे संबोधू नका. राम आणि कृष्ण हे ऐतिहासिक पुरुष होते, फक्त काल्पनिक पात्र नव्हते.

४.आपल्या मूर्तीपूजेसाठी लाज वाटून “हे फक्त प्रतीकात्मक आहे” असे म्हणू नका. सर्व धर्मांत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मूर्तीपूजा आहे - जसे की क्रॉस, अक्षर, लेखनकला किंवा दिशा.

तसेच आपल्या देवतांच्या मूर्तींना 'Idols', 'Statues', किंवा 'Images' असे म्हणू नका. मूळ शब्द 'मूर्ती' किंवा 'विग्रह' वापरा. जसे 'कर्म', 'योग', 'गुरु' आणि 'मंत्र' हे शब्द प्रचलित आहेत, तसेच 'मूर्ती' व 'विग्रह' प्रचलित करूया.

५.गणेश आणि हनुमान यांना "Elephant God" किंवा "Monkey God" असे म्हणू नका. फक्त श्री गणेश आणि श्री हनुमान असे म्हणा.

६.आपल्या मंदिरांना "प्रार्थनास्थळ" म्हणू नका. मंदिर हे "देवालय" (देवाचे निवासस्थान) आहे, "प्रार्थनालय" (प्रार्थना स्थळ) नाही.

७.आपल्या मुलांच्या वाढदिवशी केकवर ठेवलेल्या मेणबत्त्या फुंकून विझवण्याची परंपरा बंद करा. ज्यामध्ये लाळेचे कण divine fire (अग्निदेव) वर जातात. त्याऐवजी, दिवा लावून प्रार्थना करा: "तमसो मा ज्योतिर्गमय" (हे दिव्य अग्नी, मला अंधकारातून प्रकाशाकडे ने).

८."Spirituality" आणि "Materialistic" हे शब्द टाळा. हिंदूंसाठी प्रत्येक गोष्ट दिव्यच आहे. हे शब्द भारतात ख्रिस्ती प्रचारक आणि युरोपियन लोकांमार्फत आले, ज्यांच्या संकल्पना चर्च विरुद्ध राज्य किंवा विज्ञान विरुद्ध धर्म अशा होत्या. पण भारतात ऋषी हे शास्त्रज्ञ होते आणि सनातन धर्माची मूळ पायाभूत संकल्पना विज्ञानावर आधारित होती.

९."Sin" हा शब्द वापरण्याऐवजी "पाप" म्हणा. आपल्याकडे धर्म (कर्तव्य, सत्य, जबाबदारी, विशेषाधिकार) व अधर्म (जेव्हा धर्म पाळला जात नाही) असे आहे. धर्माचा सामाजिक किंवा धार्मिक नैतिकतेशी संबंध नाही. अधर्मापासूनच 'पाप' निर्माण होते.

१०."Dhyana" ला "Meditation" व "Pranayama" ला "Breathing Exercise" असे चुकूनही म्हणू नका. यामुळे चुकीचा अर्थ पोहोचतो. मूळ शब्दच वापरा.

लक्षात ठेवा, जो स्वतःचा आदर करतो त्याचा जग आदर करतो!

ही माहिती पुढे पोचवा जेणेकरून लोक हिंदू धर्माबद्दल समजून घेतील आणि तरुण पिढीलाही शिकवतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या