🔰 मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सरकारने स्वतंत्र कायदा करावा - संजय वाघमोडे 💢 सोनवडे ता. शाहुवाडी येथे शाखा शुभारंभ

 

🔰 मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सरकारने स्वतंत्र कायदा करावा - संजय वाघमोडे

💢 सोनवडे ता. शाहुवाडी येथे शाखा शुभारंभ

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 03/12/2024 : मेंढपाळांच्यावर होणारे अन्याय व मारहाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अट्रासिटी सारखा कडक कायदा करून मेंढपाळांना संरक्षण द्यावे, तरच मेंढपाळांच्यावर होणारे हल्ले कमी होतील. असे मत संजय वाघमोडे यांनी व्यक्त केले. ते सोनवडे तालुका शाहूवाडी येथे यशवंत क्रांती संघटनेच्या नुतन शाखा शुभारंभा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

    कार्यक्रमास सुनील शेळके कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख, बाबुराव कोळेकर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संजय वाघमोडे  बोलताना पुढे म्हणाले की चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढरं चारायची कुठे ? तसेच एखाद्या खाजगी जमिनीवर मेंढ्या चारताना शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात होणाऱ्या संघर्षामुळे मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या विकून मजुरी करण्यास जाऊ लागल्यामुळे शेळ्या मेंढ्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मटणाचा मागणी तसा पुरवठा होत नाही हे थांबवायचे असेल तर सरकारने मेंढपाळांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करावा तरच मेंढपाळ आणि मेंढ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल तसेच शेळ्या मेंढ्या खरेदीसाठी शासनाकडून सर्वच मेंढपाळांना आर्थिक अनुदान द्यावे.   

यावेळी सुनील शेळके, बाबुराव कोळेकर, कुमार कार्तिक वग्रे, सुभाष वग्रे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी वसंत वग्रे शाखा संपर्क प्रमुख, नागेश वग्रे, शाखाध्यक्ष नामदेव वग्रे, उपाध्यक्ष, रावजी वग्रे, सेक्रेटरी, विष्णू वग्रे खजिनदार, दादू वग्रे,सदाशिव वग्रे, भीमराव वग्रे, गणपती वग्रे, संजय बंडगर, नवलाप्पा वग्रे, दादासो वग्रे, विठ्ठल वग्रे, बाबासो वग्रे, महादेव वग्रे, महादेव यमगर, सागर वग्रे,बाळुशा  वग्रे,जयसिंग वाडकर , बाळू वग्रे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. 

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरदेव गणेश तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी योगदान दिले यावेळी भारत वग्रे, प्रतिक वग्रे तात्या दादा वग्रे, संतोष वग्रे, संजय वग्रे, टेलर   प्रकाश वग्रे, दादासो ग वग्रे, प्रतिक शा वग्रे, बाबासो वग्रे, रामा वग्रे, सुरेश बंडगर, लाल्या वग्रे, इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासो नवलप्पा वग्रे यांनी केले.  आभार पोपट वग्रे यांनी मानले,कार्यक्रमास सोनवणे गावातील  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या