"विद्यार्थ्यांनी विविध कलेची जोपासना करावी" - जयसिंह मोहिते पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/12/2024 :
प्रत्येकाने आयुष्यात एक तरी कला जोपासली पाहिजे.प्रताप क्रीडा मंडळ मागील 44 वर्षापासून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
या माध्यमातून आजपर्यंत अनेक कलाकार घडले असून त्यांनी अकलूजचे नाव राज्य-राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचवले असल्याचे प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
स्मृतीभवन शंकरनगर येथे प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त दि. २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत शालेय मुला-मुलींच्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, प्रत्येकाने आयुष्यात एक तरी कला जोपासावी. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होत आहे.व पालक ही या मुलांना प्रोत्साहन देत आहेत. त्यात हार-जीत यापेक्षा माझ्यासारखे पंचाहत्तर वर्षे पुर्ण झाल्यावर सर्वांना या स्पर्धा आठवणीत राहतील.
या कार्यक्रमास दिपकराव खराडे पाटील, अँड. नितीन खराडे पाटील,सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, निशा गिरमे, नारायण फुले, रामचंद्र गायकवाड, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील,
सिनेनृत्यदिग्दर्शक सागर राऊत, सिनेअभिनेते कुणाल मराठे, नृत्यदिग्दर्शक आशिष देसाई,
सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर, प्रा.डॉ.विश्वनाथ आवड,दिलीप शिर्के, नामदेव काळे प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष स्वरूपारांणी मोहिते पाटील म्हणाल्या, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. गीताची निवड, त्याचे सादरीकरण, मांडणी कशी असावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. परिक्षक सागर राऊत म्हणाले की, या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कलाकार,कोरिओग्राफर हे एवढी मेहनत घेताना पाहुन जसे इंडिया गाॅट टॅलेंट आहे तसे या भागातील हे टॅलेंट आहे. इथून पुढे शंभर वर्षे ही स्पर्धा पुढे चालावी अशा शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचा गटवार निकाल पुढील प्रमाणे गट २ रा- ५ वी ते ७ वी (ग्रामीण गट)प्रथम- श्री. बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस
द्वितीय- श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला, नातेपुते
तृतीय- श्री. गणेश विद्यालय पिंपळनेर
चतुर्थ- कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती
पाचवा (विभागून)- जि प प्राथमिक शाळा वेळापूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर. (शहरी गट)
प्रथम- महर्षी प्रशाला, यशवंतनगर
द्वितीय- जिजामाता कन्या प्रशाला,अकलूज
तृतीय- सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज.
गट 8 वी ते 10वी (ग्रामीण गट ब)...
प्रथम क्रमांक श्रीमती. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय, मांडवे
द्वितीय - माध्यमिक आश्रमशाळा, मोरोची, तृतीय (विभागून)
पार्वतीबाई ननवरे हायस्कूल, खंडाळी व श्रीनाथ विद्यालय, लोंढे मोहितेवाडी, चौथा- श्री समर्थ रामदास विद्यामंदिर, शिवथर.
गट ८ वी ते १० वी (ग्रामीण गट-अ) प्रथम क्रमांक- सदाशिवराव माने विद्यालय, माणकी, द्वितीय- श्री सावतामाळी विद्यालय, माळेवाडी,
तृतीय - श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस, चौथा- श्रीमती. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील कन्या प्रशाला, नातेपुते, पाचवा - श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरुड
0 टिप्पण्या