अकलूज येथे शिवरत्न टॅलेंट सर्च 2025 परीक्षेचे आयोजन

 अकलूज येथे शिवरत्न टॅलेंट सर्च 2025 परीक्षेचे आयोजन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 13/12/2024 : शंकरनगर अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित  शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (शिवरत्न पॅटर्न,अकलूज) च्या वतीने इ.१० वी मधील विद्यार्थ्यांसाठी "शिवरत्न टॅलेंट सर्च परीक्षा 2025" चे दिनांक  05/01/2025 रोजी शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,अकलूज येथे आयोजन करण्यात आले आहे. 

या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास १०,०००/- रुपये, द्वितीय क्रमांकास ७०००/- रुपये, तृतीय क्रमांकास ५०००/- रुपये तर उत्तेजनार्थ पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००/- रुपये व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तरी परीक्षा देण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSep_N8jYHZi9nHJZ_h5SxlZ6VXXy6WNGX6W8lhNjHwYW3v0cQ/viewform?usp=sf_link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या