💢 ओळखा पाहू हे कोण
वृत्त एकसत्ता न्यूज
पुणे प्रतिनिधी दिनांक 09/11/2024 :
महाराष्ट्राचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, लोकशाही मूल्य रसातळाला नेऊन ठेवणारे फोटोतील हे कोण ओळखा पाहू.
तुम्हाला समजत नसेल तर हिंट /क्ल्यू clue देतो, मग तर ओळखाल.
# 'जलयुक्त शिवार अभियान' द्वारे 'दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे' स्वप्न दाखवून *'टॅंकरग्रस्त कोरडवाहू राज्य'* केले. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. चौकशी निःपक्षपाती पणे केली नाही.
# राजकीय फायद्यासाठी *70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यावर* पांघरून घातले. प्रकल्प प्रलंबित ठेवले.
# सर्वोच्च न्यायालय व विधानसभा अध्यक्षाच्या मदतीने अपात्र आमदारांचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे *पक्षांतर बंदी कायदा* मोडीत काढला. लोकशाही मूल्य पायदळी तुडवले. व *'राजनैतिक व्यभीचार'* केला.
# कर्जमाफी योजनांमध्ये क्लिष्ट निकष, अटीतटी ठेऊन शेतकऱ्यांना *कर्जमाफी पासून वंचित ठेवले*. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे फक्त गाजर दाखवले.
# शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडून *'पक्षफोड्या'* असा किताब मिळवला.
# मराठा, धनगर, ओबीसी, दलित मध्ये फाटाफुट करून त्यांच्यात *भांडणे* लावली.
# शेतकऱ्यांना दिवसा वीज अशा घोषणा करून सौर ऊर्जा योजना माथी मारली. *वीज प्रकल्प मूलभूत पायाभूत सुविधांची गुंतवणूक केली नाही*.
# गृहमंत्री म्हणून वचक ठेवला नाही. सुसंस्कृत, शांत व संत परंपरच्या महाराष्ट्राचे गुन्हेगाराचे, बलात्कारीचे, ड्रगग्रस्त व कोयता राज्य केले. अल्पवयीन मुलीही असुरक्षित.
# *न्यायालयात न टिकणारे *खोटे आरक्षण देऊन मराठ्यांची दिशाभूल केली*.
# 3600 कोटी रुपयाचा अरबी समुद्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या, 'शिव स्मारक' प्रकल्पाचे स्वप्न दाखवले. आठ वर्षे झाली, तिथे एक विट ही अजून उभारली गेली नाही.
# त्यांचा पॅटर्न : केल्यासारखे दाखवतात, पण काहीच करत नाहीत.
# जलजीवन मिशन सारख्या पूर्ण न झालेल्या अनेक प्रकल्पाची खोटी जाहिरात करून जनतेच्या पैशाची करोडो रुपयांची *उधळपट्टी* केली.
# स्वतः न बोलता, सत्ता व पद मिळण्यासाठी लाचार झालेल्या सहकारी बहुजन चमच्यांकडून वादग्रस्त व वाह्यात वक्तव्ये करून घेण्याची *नीच रणनीती*.
# महाराष्ट्रातील भूखंड, वीज निर्मिती, वितरण, मीटर, कोळसा खरेदी वगैरे प्रकल्प *अदानीच्या घशात* घातले.
# फॉक्सकॉन-वेदांता, टाटा एअरबस (नागपूरला भूमिपूजन झालेला) असे अनेक महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. त्यामुळे 18 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक बाहेर गेली. त्यामुळे *1 लाख तरुण युवकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी गमावल्या.*
# मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाई गडबडीत निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे पडला. *ज्यामुळे शिव प्रेमींची मने दुखावली*.
# महाराष्ट्रात फुकट वाटप रेवडी पद्धत आणून *आत्मसन्मान संस्कृतीकडून भिकारी पद्धतीकडे वाटचाल* सुरु केली.
# महाराष्ट्राचे 2014 मध्ये 2.94 लाख कोटी रु. कर्ज होते. ते आज अडीच पट, *7.82 लाख कोटी रु. झाले असून देशात क्रमांक 2 चे कर्जबाजारी राज्य* केले.
# सरकारच्या आकडेवारी नुसार गेल्या दशकात भारतातील महाराष्ट्राचे योगदान, जीडीपी (राष्ट्रीय सकल उत्पन्न) प्रथमच 2.1 टक्क्यांनी घसरले आहे. दरडोई उत्पन्न, जे राज्यातील आर्थिक सुबत्तेचे निकष असते, त्यात मोठ्या प्रमाणावर घसरण केली.
# बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा संशयास्पद एन्काऊंटर करून मूळ सूत्रधारांचा बचाव केला. व *'बदला पूरा'* अशी पोस्टरबाजी केली.
# दाभोळकर खून खटल्यामध्ये तपास करण्यामध्ये 11 वर्षाचा विलंब केला. शेवटी दोषींना शिक्षा झाली, पण पुराव्या अभावी *मुख्य सूत्रधार निर्दोष सुटले*.
# शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये देशात महाराष्ट्र राज्याचा *प्रथम क्रमांक* मेंटेन (कायम) केला. काहीही ठोस उपाययोजना केल्या नाहीत.
# विरोधी पक्षात असताना सोयाबीनचे भाव 8000/- रु/ क्विंटल मिळावे म्हणून आंदोलने केली. आज 10 वर्षां पूर्वीचाच भाव, 4000 रु./ क्विंटल आणून ठेवला.
# विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीने, उच्च न्यायालयाने आदेश देऊनही, 4 वर्षे निष्क्रय राहून नियुक्ती केली नाही. ह्या उलट स्व पक्षाच्या शिफारसी प्रमाणे मागच्या महिन्यात 7 आमदारांना राज्यपालाने एका रात्रीत मान्यता दिली व त्यांचा शपथविधी ही पार पडला. *'राज्यपाल हा राजकीय नसतो' हा पायंडा पायदळी तुडवला.*
# विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय वगैरे चा जाच लावून त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडून नवीन *"राजनैतिक व्यभिचाराचा" पायंडा पाडला*.
# महाराष्ट्राच्या नैतिक राजकारणाचा अक्षरशः चिखल केला.
# सत्य मांडणाऱ्या विरोधी सामाजिक कार्यकर्त्यांना *'शहरी नक्षलवादी*' म्हणून हिणवले व काहींना तुरुंगात टाकले.
# भुमि अधिग्रहण कायद्यामध्ये 26 एप्रिल 2018 साली मोडतोड करून अन्यायकारक पद्धतीने, *शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन गिळणगृत करून त्यांना भूमिहीन बनवले*.
*आता तरी ओळखले का?*
सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518
एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास.
0 टिप्पण्या