"श्री शंकर" स. सा. कारखान्याच्या ५१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

 

"श्री शंकर" स. सा. कारखान्याच्या  ५१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या कारखान्याच्या ५१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत    बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात झाला.  काटा पूजन गव्हाण पूजन आणि गव्हाणीत उसाची पहिली मोळी टाकण्याचे कार्यक्रमास कारखान्याचे जेष्ठ सभासद चंदन तुपे (मेडद), जगन्नाथ कोरटकर (गुरसाळे), मनोहर देवकर(मोही), ज्ञानदेव खुडे(मांडवे),  जगन्नाथ महामुनी(फोंडशिरस),  साधू गोरे(फोंडशिरस), मच्छिन्द्र हुंबे(हनुमानवाडी(क)), श्रीरंग तरडे(मोटेवाडी), महादेव गेंड(भांबूर्डी), सुभाष शिंदे(माळशिरस), दस्तगीर मुलाणी(नातेपुते),  कृष्णदेव पवार आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कै. काकासाहेब व अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद यांनी केले. यावेळी ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम गणेश कोडलकर, शेतकरी सभासद अंकुश डुबल यांच्या बैलगाडीचे पूजन केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन विधानपरिषद तथा श्री शंकर सहकारी चे चेअरमन  रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. तसेच व्हा. चेअरमन. ऍड मिलिंद कुलकर्णी, सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, माजी सभापती  सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती  अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शिवामृत दूध संघांचे संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, खरेदी विक्री संघांचे संचालक, श्री शंकर सहकारी चे सर्व संचालक, शेतकरी सभासद, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, व्यापारी, ग्रामस्थ व कारखान्याचे एक्झिकुटीव्ह डायरेक्टर  स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या