"कर्ज फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी"

"कर्ज फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी" 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 06/11/2024 : कर्ज विक्री प्रक्रियेतील फसवणुकीमुळे ग्राहकांना आर्थिक नुकसान आणि अनेक समस्या सहन कराव्या लागतात. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी काही आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

 ग्राहकांना होणारे तोटे: 

1. अधिक शुल्क आणि व्याजदर : फसवणूक करणारे एजंट कर्ज मंजुरीसाठी कमी दर दाखवतात पण प्रत्यक्षात अधिक शुल्क किंवा व्याजदर लागू करतात. त्यामुळे ग्राहकाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे भरावे लागतात.

2.नकली किंवा चुकीची माहिती : कर्ज प्रक्रियेत ग्राहकांची नकली माहिती तयार करून मंजुरी मिळवली जाते, ज्यामुळे कर्जफेडीत अडचणी निर्माण होऊ शकतात आणि ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.

3. अनधिकृत कर्ज वितरण : ग्राहकाच्या नावावर बोगस कर्ज वितरित करून ग्राहकाला कर्जाची जबाबदारी घेतल्याशिवाय कर्जफेड करावी लागते.

4. चुकीच्या उत्पादनांचा सल्ला : ग्राहकांसाठी योग्य नसलेल्या आणि महाग असलेल्या कर्ज उत्पादने देऊन आर्थिक नुकसान केले जाते.

5. व्यवसायात गैरव्यवहार : फसवणूक करणारे एजंट कमी माहिती असलेल्या ग्राहकांपासून अधिक पैसे उकळतात आणि माहिती मिळवून स्वतःला फायदा करून घेतात.

 ग्राहकांनी घ्यावयाची काळजी: 

1. सर्व कागदपत्रे तपासा : कोणतेही कर्ज घेताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. विशेषतः कर्जाचे व्याजदर, प्रक्रिया शुल्क, इतर सेवा शुल्क, इत्यादींची तपासणी करा.

2. सोप्या प्रस्तावांना शंका घ्या : खूपच सोपी आणि आकर्षक असलेली कर्ज प्रस्तावना फसवणुकीचे कारण असू शकते. अशा प्रकरणांमध्ये इतर पर्यायांचा विचार करा.

3. कर्ज देणाऱ्या कंपनी वेबसाइटवरून खात्री करा : कर्जासाठी अर्ज करताना संबंधित कंपनीची अधिकृत वेबसाइट तपासा आणि वितरक/एजंटवर विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करून घ्या.

4. तज्ञांचा सल्ला घ्या : कर्जाच्या अटी आणि शर्ती स्पष्ट नसतील तर तज्ञांचा सल्ला घ्या. वकील किंवा आर्थिक सल्लागाराकडून कागदपत्रांचे स्पष्टीकरण मिळवा.

5. मोबाईल अ‍ॅप्स आणि डिजिटल सुरक्षितता : कंपनीचे अधिकृत मोबाइल अ‍ॅपचा वापर करा आणि कोणत्याही अनधिकृत किंवा असुरक्षित प्लॅटफॉर्म वर आपली माहिती नोंदवू नका.

सणासुदीच्या दिवसात तर कोणतेही कर्ज सहज व जलद उपलब्ध होते आहे म्हणून घेणे किंवा कुणाच्या चुकीच्या सल्ल्याने कागदपत्रात फेरफार करून कर्ज मिळविणे नंतर अडचणीचे ठरू शकते.

अडचण व फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सावध राहून पडताळणी करावी. कर्ज घेताना योग्य दक्षता घेतली तर ग्राहकांचे भविष्यातील आर्थिक नुकसान नक्कीच टळेल.

लेखक:  नंदन पंढरीनाथ दाते.

Professional Financial Advisor, Financial Risk Advisor, Digital Transformation Consultant, BFSI. Advisor, Digital Transformation Consultant, BFSI.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या