भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव भाग्यवंत ल. नायकुडे यांचा सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
माळशिरस/ प्रतिनिधी : अकलूज येथील सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांची भारतीय राष्ट्रवादी पार्टी च्या राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल तरंगफळ (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती जगूबाई मारुती जानकर (सदस्या ग्रामपंचायत तरंगफळ) यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मारुती जानकर, वृत्त एकसताचे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड हे उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे संस्थापक व राष्ट्रीय प्रधान महासचिव डॉ. भगवानभाई मा. दाठीया यांच्या स्वाक्षरीने सदर नियुक्तीपत्र प्राप्त झाल्याचे याप्रसंगी नूतन राष्ट्रीय सचिव भाग्यवंत ल. नायकुडे यांनी सांगितले.
"वयाच्या सोळाव्या वर्षापासून अखंड पन्नास वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत असलेले निर्भिड, निस्वार्थी, निष्कलंक पत्रकार नायकुडेदादा यांचा सन्मान करण्याचा योग आमच्या निवासस्थानी अनपेक्षित पणे जुळून आल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे" असे मत याप्रसंगी श्रीमती जगुबाई जानकर यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या