विधानसभेसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण नारीशक्तीकडे

 विधानसभेसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण नारीशक्तीकडे

वृत्त एकसत्ता न्यूज 

मुंबई दिनांक 14/11/ 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्यात येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यांत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्रे असतील. महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी महिलाच असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक सहभागासाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्रे असणार आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रांत कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना तेथील सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्रे नगर १२, अकोला ६, अमरावती ८, छत्रपती संभाजीनगर १३, बीड ८, भंडारा ८, बुलडाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५, जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४, धाराशिव ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७, ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या