💢 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या "63 व्या" ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ
🔵 "9 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट"
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/11/2024 : शंकरनगर-अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-2025 चा 63 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि.08/11/2024 रोजी दुपारी 1:35 वाजता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
कारखान्याने गळीत हंगाम 2024-2025 मध्ये 9 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. सर्व मशिनरी गाळपासाठी सज्ज असून प्रतिदिवशी 8,500 मे.टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक ॲड. प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक - रणजित रणनवरे, कार्यकारी संचालक - राजेंद्र चौगुले, माजी संचालक - सुरेश मेहेर, बाळासाहेब पवार (तरसे), भिमराव काळे, विजय माने-देशमुख, विजय हेगडे, महादेव घाडगे, मोहनराव लोंढे, धनंजय चव्हाण, राजेंद्र मोहिते, चांगदेव घोगरे, केशवराव ताटे, शिवाजी सिद, सुनिल एकतपुरे, महादेवराव चव्हाण, रामचंद्र चव्हाण व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक - पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, धनंजय सावंत, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या