श्रीपूरचे श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट मध्ये तृतीय

श्रीपूरचे श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट मध्ये तृतीय

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 14/10/ 2024 :  नुकत्याच झालेल्या श्री गणेशोत्सव महोत्सवात जिल्हा पातळीवरील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून श्रीपूर येथील शिवाजीनगरचे श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व शिफारस पत्र जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सोलापूर जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या संवाद हॉलमध्ये देऊन सन्मानित करण्यात आले.



पारितोषिक सन्मानचिन्ह आणि शिफारस पत्र घेऊन श्रीपूर मध्ये आल्याबरोबर मंडळाच्या सर्व सदस्यांनी श्रीपूर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक स्थळी जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी सर्वोत्कृष्ट विजेत्या मंडळाच्या वतीने नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटीज महासंघ दिल्ली अर्थात एनयूबीसी चे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख व प्रसिद्धी प्रमुख जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. 


"वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व शरद जोशी शेतकरी विचार महासंघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख व महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख पदाधिकारी म्हणून दोन्हींच्या आणि एनयूबीसी या महासंघाच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देत आहे. ही फक्त सुरुवात आहे. आपणाला येथेच थांबायचे नाही तर जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांक त्याचबरोबर भावी काळामध्ये शासनाचे जिल्हा पातळीवरील, राज्य पातळीवरील बक्षीस आपणाला खेचून आणावयाचे आहे. त्यासाठी आवश्यकते सर्व मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन. आपल्या माळशिरस तालुक्याचे नाव शासनाच्या पारितोषिकावर कोरावयाचे आहे या जिद्दीने माळशिरस तालुक्यातील श्री गणेश उत्सव मंडळां च्या सदस्यांबरोबर बरोबर माझी चर्चा सुरू असते". असे या निमित्ताने बोलताना पत्रकार भाग्यवंत नायकुडे यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या