कै. साखरबाई सोपान देशमुख यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त किर्तन सेवा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज : 61 फाटा माळशिरस येथील कै. साखरबाई सोपान देशमुख यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त ह.भ.प. धनंजय महाराज गुरव धोंडेवाडी यांची फुलांची किर्तन सेवा संपन्न झाली.
शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत झालेल्या फुलांच्या कीर्तन प्रसंगी उपस्थित राहून श्रोत्यांनी कै. साखरबाई सोपान देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी देशमुख परिवाराच्या वतीने आयोजित अन्नदान सोहळ्याचा लाभ उपस्थित आणि घेतला.
0 टिप्पण्या