रानभाजी संवर्धन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/10/ 2024 : पावसाळा आला की, परिसरातील ग्रामस्थांना ओढ लागते ती रानभाजी खाण्याची. रानभाजी बनवण्याची कला तरुणपिढीला अवगत नसली तरी, लहानपणीची जिभेवर रेंगाळणारी रानभाजीची चव कोणीही विसरू शकत नाही. मग रानभाजी बनवण्यासाठी तरी ज्येष्ठ महिलांची घराघरातून मनधरणी चालू होते.
पण पावसाळ्यात दिसणार्या रानभाज्या लुप्त होताना दिसत आहेत. पहिल्या पावसाचा शिडकाव होताच आदिवसी समाजाकडून मिळणारी भारंगीची भाजी आता गावामधून औषंधा पुरती ही उपलब्ध होताना दिसत नाही. तशीच परिस्थिती अळंबी, करटोली या बाबतीत ही होत आहे. आदिवासी समाजाच्या उत्पनाचे साधन असणार्या या रानभाज्या एकेकाळी परिसरातून भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असत. गावकरी या भाज्यांचा आवडीने आस्वाद घेत असत. पण डोंगर भागात होणार्या फॉर्महाउस मुळे नि डोंगरांमुळे या भाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
रानभाजी हे आदिवासी समाजाच्या उत्पनाचे साधन बदलू लागली. रानावनातून भटकंती करून उदरनिर्वाह करणारा हा समाज आता मोलमजुरी, शेती, नोकरी, धंदा याकडे वळत चालला आहे. त्यामुळे पारंपारिक असणार्या या रानमेवा, रानभाज्या विक्रीचा त्यांचा ओढा आता कमी झाला आहे. पूर्वी प्रमाणे डोंगारात, जंगलात वेळ घालवूनही रानभाज्या आता जास्त प्रमाणात मिळत नाहीत, त्यामुळे हातबट्याचा हा व्यवहार आता कमी होत आहे. सध्याच्या कुमार वयातील मुलांना, कृषी अधिकाऱ्यांना आणि शेतीतज्ञांना अनेक रानभाज्यांची नावेही माहित नसल्याचे दिसत आहे. भरपूर खनीज, पौष्टीक, चवीष्ट असणार्या या रानभाज्या आता दुर्लभ होत आहेत हे नव्या पिढीच्या दृष्टीकोनातून तोटा करणारे आहे. रानभाज्याचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. याचा विचार करून रानभाज्याचे संवर्धन करण्यासाठी कृषी विभागाने पाऊल उचलण्याची गरज आहे. विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, व शेतीतज्ञ यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे. या रान भाज्यांचे संवर्धन आवश्यक आहे.
संदर्भ : इंटरनेट/सिद्धी भगत
संकलन : प्रविण सरवदे, कराड,
0 टिप्पण्या