💢"नाशिक डिसीसी, शेतकरी जमीन जप्ती लिलाव, प्रकरणी सामूहिक आत्महत्येचा इशारा... 🟦 मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, विठ्ठल राजे पवार यांची माहिती

 

💢"नाशिक डिसीसी, शेतकरी जमीन जप्ती लिलाव, प्रकरणी सामूहिक आत्महत्येचा इशारा... 

🟦 मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, विठ्ठल राजे पवार यांची माहिती

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 04/10/ 2024 :  जिल्हा बँकेचे प्रशासक रिकवरी ऑफिसर कडून शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने व बेकायदेशीरपणे जप्त करून त्याचे लिलाव केल्याप्रकरणी संघटनेने केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आलेली असून तशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री यांनी गृह विभाग प्रशासनाला दिल्या हे आहेत तसेच नाशिक जिल्हा बँकचे संचालक मंडळाने बिगर शेती व औद्योगिक कर्ज बेकायदेशीरपणे अनियमितपणे कर्ज वाटप केल्या मुळे नाशिक जिल्हा बँक आर्थिक डबगाई. संकटात आणणाऱ्या बँकेचे संचालक मंडळ तत्कालीन आमदार पालकमंत्री व मंत्री यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करून बँकेचे एक हजार कोटी वसूल करावेत अशी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आरबीआयचे गव्हर्नर व राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज तीन सप्टेंबर रोजी गंभीर दखत घेण्यात आल्याचा ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष त्याचा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी पत्रकारांना दिली.

नाशिक जिल्हा बँकेने चुकीच्या पद्धतीने केलेले कर्जवाटप अनियमितता व कर्ज वाटपत केलेल्या आर्थिक भ्रष्टाचारामुळे नाशिक जिल्हा बँक संकटात आली त्याला नाशिक जिल्ह्यातला कोणताही शेतकरी जबाबदार नाही असा इशारा देत, नाशिक जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, विद्यमान प्रशासक चव्हाण व रिकवरी अधिकारी तसेच डी डी आर उपनिबंधक सहकार आयुक्त सहकार, सरकार सचिव व सहकार मंत्री जबाबदार असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली व शेती जप्ती प्रकरणात एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्याला वरील सर्वांना जबाबदार धरण्यात येईल, तसेच संघटना न्यायालयात जाऊन संबंधितांच्या विरुद्ध सुदेश मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करेल असा इशारा संघटनेने दिलेला आहे, तत्पूर्वी बँकेने दिलेल्या जप्ती व शेत जमीन लिलावाच्या नोटीसा मागे घेऊन कोणतेही शेतकऱ्याची जमीन जप्त होणार नाही, शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या मुलीला केलेल्या जमिनीच्या हक्कामध्ये संबंधित शेतकऱ्याचे नाव ठेवून इतर हक्कात बँकेने आपले नाव ठेवावे अशी मागणी संघटनेने केलेली आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी संघटने कडे दिलेल्या तक्रारीची संघटनेने गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, आरबीआय व उच्च न्यायालयाकडे लिखित तक्रार दाखल केलेली आहे, त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेली असून तसा ईमेल संघटनेला पाठवलेला आहे, नाशिक जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकऱ्यांनी दिलेल्या सामूहिक आत्महत्येची इशाऱ्याची जबाबदारी सरकारवर राहील, तर संघटना संबंधित बँकेच्या प्रशासक वसुली अधिकारी व संचालक मंडळ जिल्हाधिकाऱ्यांवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल, आणि करण्याचा इशारा देखील संघटनेने दिला असल्याची  माहिती अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी दिली आहे ,निवेदनावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार प्रदेश सचिव डॉक्टर गजेंद्र पाटील प्रदेश उपसचिव काशिनाथ जाधव नाशिक जिल्हा विभाग उत्तर व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अण्णासाहेब खैरनार एडवोकेट कोर यांच्यासह आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या