पूर्वा शिंदे, शितल राऊत,इशिता शिंदे, परवेज आतार यांची जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/10/ 2024 : सोलापूर जिल्हा गुणवत्ता विकास / विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी स्पर्धा 2024-25 शिक्षण विभाग,पंचायत समिती माळशिरस आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नं.2 व मुली नं.3 अकलुज या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धेत लहान गट (इ.1 ते 5) मध्ये एकूण 30 तर मोठा गट (इ.6 ते 8) यामध्ये एकूण 28 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
मोठ्या गटातील निकाल पुढीलप्रमाणे,
प्रथम क्रमांक -शितल नितीन राऊत, शाळा-निमगाव ( म.)
द्वितीय क्रमांक -परवेज समीर आतार ,शाळा-निमगाव ( म.)
तृतीय क्रमांक -अनुष्का महादेव सिद,शाळा- पिसेवस्ती
उत्तेजनार्थ
1) गौरी विकास व्यवहारे, शाळा -नेवरे
2) देवयानी विपुल कोच, शाळा-महाळुंग
3) समीक्षा रामचंद्र भडके, शाळा- चाकोरे
लहान गट (इ.1 ते 5) निकाल
प्रथम क्रमांक-पूर्वा नवनाथ शेंडे, शाळा-निमगाव(म.)
द्वितीय क्रमांक -इशिता रणजीत शिंदे ,शाळा-शिंदेवाडी
तृतीय क्रमांक- राजकुमारी मुकेश माली, शाळा- कन्या माळशिरस
उत्तेजनार्थ..
1) सोनाक्षी सुनील सावंत, शाळा-मुंडफणेवाडी
2) अनुष्का विजय चव्हाण, शाळा- जाधववाडी
3) प्रांजली विठ्ठल जाधव,शाळा- ताटे देशमुखवस्ती सर्व विजेत्या स्पर्धकांचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे, विस्तार अधिकारी सुषमा महामुनी, केंद्रप्रमुख प्रभाकर ननवरे यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, रत्नाई अकॅडमीचे सिद्धार्थ चव्हाण, पत्रकार राजू लोहकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. परीक्षक म्हणून तानाजी काशीद, दत्तात्रय शिंदे, लक्ष्मण धोत्रे, यांनी काम पाहिले. स्पर्धा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सुकुमारी अंगुले, दत्तात्रय कोरे व अकलूज केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या