रानभाजी - कडवंची

 

रानभाजी - कडवंची  

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 02/10/2024 : कडवंची ही एक रानभाजी असुन, अपुऱ्या वैज्ञानिक क्रांतितील रासायनिक खतांपासून सध्यातरी अलिप्त आहे. म्हणूनच ती आरोग्य संपन्न, मनुष्याचे आरोग्य संवर्धन करणारी कडू , तुरट चवीची आहे. कडवंची ही प्रामुख्याने पित्तशामक असून, त्रिदोषनाशक आहेत. कफ, वात, पित्ताचा समतोल साधणारी ही रानभाजी कंबर, गुडघ्याला सुरक्षित ठेवणारी, शारीरिक झीज भरून काढणारी एकमेवा द्वितीय आहे. कडवंची ही कंबरदुखी, गुडघेदुखी, दातांचे विकार, नेत्रचक्षूदोषावर पावसाळ्यात नियमित खाल्ल्यास गुणकारी व लाभप्रद निश्चितच आहे. ही भाजी निसर्गाची किमया आहे. या रानभाजी मध्ये विपुल प्रमाणात लोह, कॅल्शियम, खनिजद्रव्ये आहेत. कंबर भरून येण्यासाठी, नेत्रकांतीसाठी कडवंची सेवन अवश्य करा.

राधेश बादले पाटील, पंढरपूर

संदर्भ : आयुर्पाठ

पाककृती

# साहित्य - २५० ग्राम कडवंची, १ कांदा, अर्धा कप भिजवलेली हरभरा डाळ, २ टीस्पून लाल तिखट, १ कांदा, अर्धा चमचा लसूण मसाला, अर्धा टीनस्पून हळद, पाव टी स्पून हिंग, ३ टी स्पून तेल, कोथिंबीर, मीठ चवीनुसार.

# कृती - कडवंचीचे मागचे व पुढचे देठ काढून स्वच्छ धुवून घ्या. हरभरा डाळ धुऊन भिजत घालून ठेवा. कांदा व कोथिंबीर चिरून घेणे. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यात कांदा घालून चांगले परतून त्यात कडवंची व हरभरा डाळ घालून चांगले परतून शिजवून घ्या.आता त्यात तिखट, कांदा लसूण मसाला मीठ घालून चांगले परतून एक वाफ आणावी. कडवंची ची भाजी भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

संदर्भ : इंटरनेट/आर्य पराडकर

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या